औरंगाबादः अजिंठा लेणीत खासगी वाहनांना परवानगी, एसटी बससेवा संपामुळे ठप्पच, आतापर्यंत 30 कर्मचारी निलंबित

अजिंठा लेणीसाठी बैलगाडी चालक एका फेरीसाठी दोन हजार रुपये भाडे पर्यटकांकडून वसूल करत असल्याने पर्यटकांना आर्थिक फटका बसत होता. यामुळे अजिंठ्यातील व्यापाऱ्यांनी लेणीत खासगी बसना परवानगी देण्याची मागणी लावून धरली होती.

औरंगाबादः अजिंठा लेणीत खासगी वाहनांना परवानगी, एसटी बससेवा संपामुळे ठप्पच, आतापर्यंत 30 कर्मचारी निलंबित
एसटीच्या संपामुळे अजिंठा लेणीत खासगी वाहनांना परवानगी
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 10:52 AM

औरंगाबादः एसटी महामंडळाच्या (ST Strike) कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून यामुळे महामंडळाला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. औरंगाबाद विभागातील कन्नड, वैजापूर, सिल्लोड येथील प्रत्येकी 5 अशा 15 कर्मचाऱ्यांचे गुरुवारी निलंबन करण्यात आले. औरंगाबादेत निलंबन झालेल्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या आता 30 वर पोहोचली आहे. मात्र निलंबनाचे पत्र म्हणजे एसटी शासनात विलीन करण्याच्या लढ्यातील सुवर्णपदक असल्याची भावना निलंबन झालेल्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पर्यटनाचा हंगाम असल्यामुळे अजिंठा लेणीत (Ajintha Caves) येणाऱ्या पर्यटकांना लेणीपर्यंत घेऊन जाण्यासाठी सिल्लोड (Sillod) येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी दहा खासगी वाहनांतून तीस रुपये सीटप्रमाणे पर्यटकांना अजिंठा लेणी सफरीची सुविधा प्राप्त झाली.

अजिंठा लेणी पर्यटनावर संपाचा परिणाम

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मंगळवारपासून अजिंठा लेणीतील प्रदूषणमुक्त बससेवा ठप्प झालेली आहे. तीन दिवसांपासून अजिंठा लेणी भेटीवर आलेल्या पर्यटकांना फर्दापूर टी पॉइंटे ते अजिंठा लेणी हे चार किमी अंतर पायी किंवा बैलगाडीतून प्रवास करून गाठावे लागत होते. त्यातच बैलगाडी चालक एका फेरीसाठी दोन हजार रुपये भाडे पर्यटकांकडून वसूल करत असल्याने पर्यटकांना आर्थिक फटका बसत होता. यामुळे अजिंठ्यातील व्यापाऱ्यांनी लेणीत खासगी बसना परवानगी देण्याची मागणी लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक रामदास क्षीरसागर यांनी अजिंठा लेणीत खासही वाहनांना वाहतुकीची परवानगी मिळाल्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. गुरुवारी या प्रस्तावाला मंजुरी मिळाली.

आंदोलनाने एसटीचे निघाले दिवाळे

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सलग चौथ्या दिवशी सुरूच आहे. औरंगाबाद विभागाला मागील वर्षी दिवाळीत 2 कोटी 29 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा 1 ते 6 नोव्हेंबरदरम्यान 3 कोटी 9 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यंदा एसटी प्रवाशांची संख्या वाढली होती. तसेच भाडेवाढही करण्यात आली होती. त्यामुळे औरंगाबाद विभागाचे रोजचे उत्पन्ना 45 लाखांवरून 65 लाखांपर्यंत गेले होते. परत जाणाऱ्या प्रवाशांमुळे एसटीच्या तिजोरीत आणखी भर पडणार होती. मात्र संपामुळे चार दिवसातच विभागाचे किमान 2 कोटींचे उत्पन्न बुडाले.

इतर बातम्या-

आधीच शाळा नाही, त्यात आत मनमानी सुट्ट्या, औरंगाबादसह अनेक जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्ट्या वाढल्या, विद्यार्थ्यांचा विचार कधी?

रेशन-पेट्रोल बंद झाल्यावर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा, औरंगाबादेत आरोग्य केंद्रांवर गर्दी

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.