Digital | डिजिटल फसवणुकींचे चक्रव्यूव्ह : कर्ज घेताना उचला ‘ही’ पावले

नागरिक प्रलोभनांना बळी पडून किंवा अपुऱ्या माहितीच्या आधारे केलेल्या व्यवहारांमुळे सायबर फसवणुकीच्या जाळ्यात अडकल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. त्यामुळं डिजिटल व्यवहारांचे सुलभीकरण होत असतानाच फसवणुकींपासून सावध राहण्याची नितांत आवश्यकता आहे.

Digital | डिजिटल फसवणुकींचे चक्रव्यूव्ह : कर्ज घेताना उचला 'ही' पावले
cyber
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 5:45 PM

डिजिटल आर्थिक व्यवहारांत मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. बँकेच्या विविध सेवांसाठी प्रत्यक्ष बँकेत जाऊन रांगा लावण्याऐवजी डिजिटल व्यवहार करण्यासाठी नागरिक प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. मात्र, नागरिक प्रलोभनांना बळी पडून किंवा अपुऱ्या माहितीच्या आधारे केलेल्या व्यवहारांमुळे सायबर फसवणुकीच्या जाळ्यात अडकल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. त्यामुळं डिजिटल व्यवहारांचे सुलभीकरण होत असतानाच फसवणुकींपासून सावध राहण्याची नितांत आवश्यकता आहे. विविध स्वरुपांच्या कर्जाची सुविधा देखील डिजिटल स्वरुपात एका क्लिकवर उपलब्ध आहेत. वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज तसेच वाहन कर्जाची सुविधा डिजिटल स्वरुपात तसेच आॉनलाईन उपलब्ध आहेत.

नागरिक प्रलोभनांना बळी पडून किंवा अपुऱ्या माहितीच्या आधारे केलेल्या व्यवहारांमुळे सायबर फसवणुकीच्या जाळ्यात अडकल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. त्यामुळं डिजिटल व्यवहारांचे सुलभीकरण होत असतानाच फसवणुकींपासून सावध राहण्याची नितांत आवश्यकता आहे.

कंपनीची प्रमाणितता तपासा

आॉनलाईन स्वरुपात कर्ज घेण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ आहे. मात्र, कर्ज घेण्यापूर्वी महत्त्त्वाची गोष्ट म्हणजे कर्ज देणाऱ्या आस्थापनांची किंवा बँकेची तसेच वित्तीय संस्थांची प्रमाणितता तपासणे. त्यामुळे कर्ज घेताना रिझर्व्ह बँकेच्या पोर्टलवर जाऊन कंपनीची प्रमाणितता तपासा. रिझर्व्ह बँकेच्या पोर्टलवर मान्यता प्रदान केलेल्या आस्थापनांना सूचीबद्ध करण्यात आलेले असते. त्यामुळे सूचीत समाविष्ट नसणाऱ्या आस्थापने किंवा वित्तीय संस्थांसोबत वित्तीय व्यवहार करणे निश्चितच टाळायला हवे. अन्यथा, तुमचे चुकीचे पाऊल मोठ्या फसावणुकीला आमंत्रण देऊ शकते. कर्ज घेताना नेहमीच पर्याप्त आवश्यकता तपासण्याचा सल्ला तज्ज्ञांद्वारे दिला जातो.

अज्ञात अॅपचा वापर टाळा

कोणतीही पडताळणी केल्याविना मोबाईलच्या स्क्रीनवर स्क्रोल करताना आलेल्या लिंकवर क्लिक केले जाते. त्यामुळे अपरिचित असलेले अॕप डाउनलोड केले जातात. अशाप्रकारचे अॕप इंस्टॉलेशन करण्याद्वारे तुमची खासगी माहिती धोक्यात येऊ शकते. डिजिटल हॕकर्स अॕप क्लोन करण्याद्वारे महत्त्वाची माहिती तुमच्या डिव्हाईसवरून प्राप्त करु शकतात. कर्ज मिळणे दूरच थेट तुमच्या अकाउंटवर डल्ला मारुन पैसे परस्पर अकाउंटमधून डेबिट करण्याचे प्रकार उजेडात आले आहेत. त्यामुळे अपिरचित अॕप इंस्टॉल करण्यापासून सतर्कतता बाळगा.

व्हा फॕक्ट चेकर

कर्ज असो वा कोणतेही डिजिटल व्यवहार तुम्हाला चूक सुधारण्याची संधी निश्चितच मिळते. मात्र, महत्त्वाचे ठरते तथ्यांची पडताळणी. आजच्या माहितीच्या वेगवान जगात तुमच्यासमोर आलेल्या माहितीची सर्वांगाने पडताळणी करा. तुम्हाला व्यवहार करताना किंचितही शंका आल्यास तत्काळ मागचे पाऊल टाका. तुमची सजगता तुम्हाला मोठ्या संकटाच्या चक्रव्यूव्हातून सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. महत्त्वाची कागदपत्रे, गोपनीय माहिती डिजिटल स्वरुपात सामायिक करताना वेबसाईट/यूआरएलची निश्चितच पडताळणी करा.

Temperature | नागपुरात भरली हुडहुडी, तापमानात घट, कसा राहील पुढचा आठवडा?

MLC election | राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये जुंपली, महाविकास आघाडीची मतं कशी फुटली?

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.