भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल सध्या मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. (Badminton player Saina Nehwal In Maldives)
Follow us
भारतीय बॅडमिंटनला खऱ्या अर्थानं जागतिक उंची मिळवून देणारी सायना नेहवाल सध्या मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे.
या हॉलिडे मूडचे काही फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
मालदीवमध्ये ती तिचा पती पी. कश्यप याच्यासोबत वेळ घालवताना दिसत आहे.
यातील एका फोटोत तिने फ्लोरल प्रिंटचा वनपीस आणि हॅट घातली आहे. त्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी सायना आणि पी. कश्यप यांनी डेन्मार्क ओपनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.
जानेवारी महिन्यापासून सुरू होणाऱ्या आशियाई टूरमधून आपण पुन्हा खेळायला सुरुवात करु, असं सायनाने सांगितलं होतं.
सायना नेहवाल बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारी अव्वल स्थानावर आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने तिला सर्वोत्तम बॅडमिंटनपटूच्या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
तसेच ती अर्जुन पुरस्काराचीही मानकरी ठरली आहे. सायनाला 2010 मध्ये पद्मश्री पुरस्काराने, तर 2009 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. तर 2016 मध्ये तिला पद्म भूषण पुरस्कार देखील बहाल करण्यात आला.
सायनाच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्पर्धाची तब्बल 22 विजेतेपद आहेत.