1 लिटरमध्ये 70 किलोमीटर धावणारी ‘ही’ बाईक आता मिळणार नाही, विक्री बंद
मोटरसायकल खरेदी करण्यासाठी मोठी वेटिंग लीस्ट असते. चांगली मायलेज देणारी बाईक खरेदी करण्यासाठी सर्वाची तयारी असते. काही मोजक्याच बाईक चांगले मायलेज देतात. परंतू एक चांगले मायलेज देणारी बाईक बाजारातून नाहीशी झाली आहे.
नवी बाईक खरेदी करताना मायलेज नेहमीच चिंतेचा विषय असतो. देशात अशा अनेक बाईक्स आहेत, ज्या उत्तम मायलेज देतात. बजाज प्लॅटिनाची गणना सर्वाधिक मायलेज बाइक्समध्ये केली जाते. ज्यांना कमी खर्चात बाईकपेक्षा जास्त प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी प्लॅटिना हा चांगला पर्याय मानला जातो. मात्र, कंपनीने Platina 110 ABS ची विक्री बंद केली आहे. आता ही बाईक बाजारात उपलब्ध होणार नाही.
Platina 110 ABS चे 70 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज
बजाजने Platina 110 ABS अधिकृत वेबसाइटवरून काढून टाकला आहे. मात्र, प्लॅटिना 110 ची विक्री सुरूच राहणार आहे. रिपोर्टनुसार, Platina 110 ABS 70 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज देते. प्लॅटिनाच्या या मॉडेलचे इतके चांगले मायलेज असताना बजाजने ते बंद का केले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
बजाज Platina 110 ABS: का बंद करण्यात आली?
बजाज Platina 110 ABS ची विक्री बंद होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे विक्री. गेल्या काही वर्षांपासून या बाईकला अपेक्षेप्रमाणे खरेदीदार मिळत नव्हते. विक्री कमी झाल्याने बजाजला या बाईकची विक्री बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. उत्तम फीचर्ससह येऊनही Platina 110 ABS ची विक्री कमी प्रमाणात करण्यात आली होती.
या प्रकरणात भारतातील एकमेव बाईक
Platina 110 ABS ही भारतातील एकमेव बाईक होती जी 125 सीसीपेक्षा कमी सिंगल चॅनेल एबीएस सह येते. त्यामुळे प्लॅटिनाचे हे सर्वात महागडे मॉडेल होते. यात 115 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे, जे 5-स्पीड गिअरबॉक्ससह येते. ज्यांना कम्युटर बाईकसोबत एबीएस हवा आहे त्यांना आता ही मोटारसायकल खरेदी करता येणार नाही.
Bajaj Pulsar F250 देखील बंद
Platina 110 ABS व्यतिरिक्त बजाज ऑटोने Bajaj Pulsar F250 मधूनही काही दिवसांपूर्वी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. Bajaj Pulsar F250 गेल्या वर्षी मे महिन्यात अपडेट करण्यात आले होते. त्यानंतर 1.51 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच करण्यात आले होते. नवीन बजाज पल्सरमध्ये नवीन बॉडी ग्राफिक्स आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह अद्ययावत डिजिटल कंसोल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
दरम्यान, उत्तम फीचर्ससह येऊनही Platina 110 ABS ची विक्री कमी प्रमाणात करण्यात आली होती. तर आता तुम्हाला ही बाईक मिळणार नसल्याची माहिती आहे.