शिवसेना नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणतात…

"महाविकास आघाडी भक्कम आहे. सर्व मंत्री एकत्रितपणे काम करत आहेत. मात्र, काही लोक आघाडीत बिघाडी होण्याची वाट पाहत आहेत", असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला (Balasaheb Torat on Shivsena Corporators Join NCP).

शिवसेना नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणतात...
Follow us
| Updated on: Jul 05, 2020 | 8:02 PM

अहमदनगर : पारनेर नगरपंचायतमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला (Balasaheb Torat on Shivsena Corporators Join NCP). याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारला असता, “आघाडीत कोणतीही बिघाडी नाही”, असं ते म्हणाले (Balasaheb Torat on Shivsena Corporators Join NCP).

पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात शिवसेना नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. याबाबत बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारला असता त्यांनी विरोधकांवर नाव न घेता टीका केली.

हेही वाचा : संजय राऊतांनी 12 आमदारांची नव्हे तर महाराष्ट्राची, कोरोनाग्रस्तांची काळजी करावी : देवेंद्र फडणवीस

“महाविकास आघाडी भक्कम आहे. सर्व मंत्री एकत्रितपणे काम करत आहेत. मात्र, काही लोक आघाडीत बिघाडी होण्याची वाट पाहत आहेत”, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला. संगमनेर तालुक्यातील शिपलापुर येथे दंडकारण्य अभियानाच्या उद्घाटनाला महसूलमंत्री आले होते. यावेळी त्यांच्याहस्ते वृक्षरोपण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

‘शेतकरी कर्जमाफीच्या दुसरा टप्प्यासाठी उपाययोजना सुरु’

“शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 2 लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली. या कर्जमाफीच्या टप्प्यात काही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. कारण तिथे आचारसंहिता सुरु होती. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा दुसरा हप्ता देण्याची उपाययोजना करत आहोत. या कामात बऱ्याच अडचणी आहेत. पण अडचणीतून चांगला मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“कोरोना संकट आल्यानंतर राज्य शासनाच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली, ही वस्तुस्थिती आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार करावाच लागतो. याशिवाय इतरही आवश्यक खर्च कारावे लागतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे आवश्यक आहे, ते करावं लागत आहे. दुसरीकडे उत्पन्नात घट झाली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी शासन उपाययोजना करत आहे”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

“शिक्षण खात्याने गाडी खरेदीचा प्रस्ताव टाकला. प्रशासनाची कामे सुरु असताना गाड्यांची गरज भासते. प्रशासनातील प्रमुख लोकांना गाड्या लागत असतात. पण, याबाबत अपूर्ण बातमी चालली. सहा गाड्यांचा प्रस्ताव होता. त्यापैकी फक्त एकच गाडी मंजूर झाली”, असं स्पष्टीकरण बाळासाहेब थोरात यांनी दिलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.