IPL 2021: परदेशी खेळाडूंना खेळवण्यासाठी BCCI ची धडपड, ‘या’ खास रणनीतीचा वापर

उर्वरीत आयपीएलचे (IPL 2021) सामने सप्टेंबर, ऑक्टोबरच्या दरम्यान युएई (UAE) येथे होणार आहेत. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली.

IPL 2021: परदेशी खेळाडूंना खेळवण्यासाठी BCCI ची धडपड, 'या' खास रणनीतीचा वापर
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 5:04 PM

मुंबई : कोरोना संकटामुळे स्थगित झालेली IPL 2021 सप्टेंबर किंवा ऑक्टोबर दरम्यान युएईत (UAE) खेळवली जाणार आहे. नुकतीच बीसीसआयने याबाबतची माहिती दिली. ठिकाण आणि तारीख बदलल्यामुळे आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत. त्यामुळे BCCI शक्य ते सर्व प्रयत्न करुन परदेशी खेळाडूंना खेळवण्यासाठी धडपड करत आहे. परदेशी खेळाडूंसाठी BCCI एका नव्या रणनीतीचा वापर करणार आहे. (BCCI will Talk to Other Boards For Foreign Players Availbility in IPL 2021)

या रणनीतीनुसार BCCI विविध विदेशी क्रिकेट बोर्डांशी बातचीत करुन त्यांच्या खेळाडूंच्या उपस्थितीबाबत चर्चा करणार आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, BCCI च्या विशेष बैठकीत आयपीएलबाबत सर्व चर्चा करण्यात आली. यावेळी परदेशी खेळाडूंची उपस्थिती या महत्त्वाच्या मुद्यावरही चर्चा झाली. ज्यात विदेशी बोर्डांसोबत बातचीच करुन यावर उपाय काढणार असल्याचे ठरले.

खेळाडूंची अदलाबदली

विदेशी बोर्डांसोबत बातचीत केल्यानंतरही काही खेळाडू जर स्पर्धेसाठी उपस्थित राहिले नाहीत. तर अशावेळी एखादा संघ दुसऱ्या संघातील खेळाडूला बदली खेळाडू म्हणून खेळवू शकतो. याआधी दुखापतींदरम्यान अशाप्रकारे अदलाबदली केली जात होती. त्याचप्रमाणे अदलाबदली केली जाऊ शकते असं बोर्डाने म्हटलंय.

इंग्लंडच्या खेळाडूंचा प्रश्न मोठा

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England and Wales Cricket Board) विश्वचषकाच्या तयारीचे कारण देत आयपीएलमध्ये खेळाडूंना खेळू देणार नसल्याचं काही दिवसांपूर्वी सांगितलं होत. बोर्डाचे व्यवस्थापक एश्ले जाइल्स (Ashley Giles) यांनी ही माहिती दिली होती. त्यामुळे इंग्लंडचे खेळाडूं खेळणार नसल्याचे जवळपास निच्छित झाले आहे.

IPL 2021 चे आयोजन

आयपीएल 2021 मध्ये सुरुवातीचे 29 सामने खेळवण्यात आले होते. त्यानंतर सध्या 31 सामने उरले आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजेच IPL 2020 ची संपूर्ण स्पर्धाही यूएईमध्येच खेळवली होती. बीसीसीआयने शनिवारच्या बैठकीत भारतातील कोरोना परिस्थितीसह हवामानाच्या मुद्यावरही चर्चा केली. त्यानंतर आयपीएलचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेणार युएईत घेणार असल्याचं बीसीसीआयने सांगितले.

संबंधित बातम्या 

IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार पुन्हा बदलणार, कोण असेल नवा कर्णधार?

IPL in UAE : बीसीसीआयने तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं, आता कमी दिवसात 31 सामने खेळवण्याचं चॅलेंज

IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय

(BCCI will Talk to Other Boards For Foreign Players Availbility in IPL 2021)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.