VIDEO: नेत्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य, समर्थकांकडून वाहतूक पोलीस निरीक्षकास बेदम मारहाण
नांदेडमध्ये (Nanded) एका राजकीय नेत्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत त्यांच्या समर्थकांनी वाहतूक पोलीस निरीक्षकाला (Traffic Police Inspector) बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला.
नांदेड : विधानसभा निवडणुकाजवळ (Assembly Election) आल्याने राजकीय कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. नांदेडमध्ये (Nanded) एका राजकीय नेत्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत त्यांच्या समर्थकांनी वाहतूक पोलीस निरीक्षकाला (Traffic Police Inspector) बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. जमावाने थेट आरटीओ (RTO) कार्यालयात घुसून अधिकाऱ्याला मारहाण केली. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे ही घटना शनिवारी (7 सप्टेंबर) घडली, मात्र अद्यापही याबाबत कुठलीही तक्रार देण्यात आली नाही. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला. नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालायात मारहाण करताना जमाव आमच्या नेत्याबद्दल अपशब्द का वापरले, असा प्रश्न विचारतानाही दिसत आहेत.
VIDEO: नेत्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य, नांदेडमध्ये समर्थकांकडून वाहतूक पोलीस निरीक्षकास बेदम मारहाण#Nanded pic.twitter.com/kZDMoSoxQX
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 8, 2019
संबंधित वाहतूक पोलीस निरीक्षकाने जमावाला आपल्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागत असल्याचंही सांगितलं. मात्र, जमावाने अचानक अधिकाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्याच्या बचावासाठी आलेल्या एका व्यक्तीलाही जमावाने मारहाण केली.
शेजारीच सिडको ग्रामिण पोलीस स्थानक असूनही कारवाई नाही
धक्कादायक बाब म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या शेजारीच सिडको ग्रामीण पोलीस स्थानक आहे. मात्र, तरीही जमावावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यावर ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरिक्षक पंडीत कच्छवे यांनी या घटनेबाबत कुठलीही तक्रार देण्यात आली नसल्याचे कारण सांगितले. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.