Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 22 तास घराची दारं बंद, कोरोनाला उंबरठा ओलांडू न देणारं बीडमधील आदर्श गाव

देशभरातील संपूर्ण शहरं लॉकडाऊन आहेत. तरीदेखील राज्यातील विविध जिल्ह्यांतील अनेक नागरिक लॉकडाऊनचं उल्लंघन करताना दिसत आहेत. मात्र, बीड जिल्हा याला अपवाद आहे (Beed Corona Update).

तब्बल 22 तास घराची दारं बंद, कोरोनाला उंबरठा ओलांडू न देणारं बीडमधील आदर्श गाव
Follow us
| Updated on: May 16, 2020 | 10:58 AM

बीड : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून देशभरात लॉकडाऊन (Beed Corona Update) घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरातील संपूर्ण शहरं लॉकडाऊन आहेत. तरीदेखील राज्यातील विविध जिल्ह्यांतील अनेक नागरिक लॉकडाऊनचं उल्लंघन करताना दिसत आहेत. मात्र, बीड जिल्हा याला अपवाद ठरला आहे (Beed Corona Update).

बीड जिल्ह्यातील उजनी गावात तब्बल 22 तास घरांची दरवाजे बंद करण्यात येतात. उरलेल्या दोन तासांत अत्यावश्यक वस्तूंसाठी नागरिक घराबाहेर पडतात. त्यामुळेच बीडमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढलेला नाही. नागरिकांनी दाखवलेला संयम आणि त्यांची जनजागृती कमालीचीच कामी आली आहे.

लातूर जिल्ह्याच्या सीमेपासून निव्वळ तीन किलोमीटर अंतरावर उजनी गाव आहे. हे गाव जरी बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील असलं तरी या गावाचा संपूर्ण व्यवहार लातूर जिल्ह्याशी निगडित आहे. मात्र सध्या लातूर रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव गावात होऊ नये, यासाठी सरपंच आणि गावकऱ्यांनी मिळून तब्बल 22 तास घराचे दरवाजे बंद करुन लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला. हा अनोखा निर्णय घेऊन कोरोनाला हद्दपार करणारं हे पहिलचं गाव आहे.

उजनी गावाची लोकसंख्या 3 हजार 400 इतकी आहे. गावात सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. विशेष म्हणजे रेशनच्या दुकानातदेखील पाच फूट अंतर ठेऊन धान्य दिलं जात आहे. गावात कुणी बाहेरच्या जिल्ह्यातून आलाच तर त्यासाठी शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. या गावात 24 तास रुग्णालय सुरु आहे. सुरुवातीला गावकऱ्यांना थोडं अवघड वाटलं. मात्र कोरोनाचा राज्यातला भयावह आकडा पाहून ग्रामपंचायतने घेतलेला निर्णय योग्य होता, असं इथले नागरिक सांगतात.

रेशन दुकानात धान्य देतानाही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन

उजनी गावात 22 तासांच्या बंददरम्यान एखाद्या नागरिकाला अत्यावश्यक सेवेची गरज भासल्यास ते थेट सरपंचाला फोन करतात. सरपंच घरापर्यंत जाऊन त्यांची व्यवस्था करतात. त्यामुळेच आज बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला नाही.

पुण्यात अ‍ॅम्ब्युलन्ससाठी तीन तास ताटकळत, खुर्चीवर बसून वाट पाहणाऱ्या रुग्णाने बायको-मुलासमोर प्राण सोडले

मोदी माझे चांगले मित्र, भारत-अमेरिका लस विकसित करणार, व्हेंटिलेटरही पाठवणार : डोनाल्ड ट्रम्प

कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा.
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार.
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा.
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती.
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप.
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.