मराठवाड्याचे शक्तीपीठ भगवानबाबा गडावर चोरी

आधुनिक पर्वातील थोर संत भगवानबाबांच्या वास्तव्याने पावन झालेला भगवानगड दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचा ऊर्जास्रोत म्हणून प्रसिद्ध आहे.

मराठवाड्याचे शक्तीपीठ भगवानबाबा गडावर चोरी
Follow us
| Updated on: Feb 27, 2020 | 12:47 PM

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील भगवानबाबा गडावर चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Bhagwanbaba Gad Theft) भगवानगडावरुन बाबांची रायफल आणि तलवार चोरीला गेल्याची माहिती आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भगवानबाबांचे समर्थक आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात भगवानबाबा गड बांधण्यात आला आहे. भक्तांना बाबांच्या वापरातील वस्तूंचे दर्शन घेता यावे, यासाठी भगवानबाबा गडावर संग्रह ठेवण्यात आला आहे.

गडावरील शो-केसमध्ये ठेवण्यात आलेली भगवानबाबांची तलवार आणि बंदुकीचा सांगाडा चोरीला गेल्याचं उघड झालं आहे. या घटनेमुळे भगवानबाबांच्या समर्थकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पाथर्डी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेमुळे भगवान गडावरील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

भगवानगडाचे महत्त्व

मराठवाड्याचे शक्तीपीठ समजल्या जाणाऱ्या भगवान गडाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधुनिक पर्वातील थोर संत भगवानबाबांच्या वास्तव्याने पावन झालेला भगवानगड दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचा ऊर्जास्रोत म्हणून प्रसिद्ध आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गडावर स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात महंत नामदेव शास्त्री यांनी राजकीय भाषणास बंदी घातली होती. यावरुन भगवान गडावर राजकीय वाद निर्माण झाला होता. मंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे भगवानबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी अनेक वेळा गडावर जातात.

काही वर्षांपूर्वी राजकीय हेव्यादेव्यांमुळे धनंजय मुंडे यांना इथे येण्यास मज्जाव करण्यात आला होता. परंतु धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर स्वतः महंत नामदेव शास्त्री यांनीच मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना निमंत्रण दिले होते.

Bhagwanbaba Gad Theft

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.