पायला चावा, तर रुग्णांच्या अंगावरून उड्या, भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उंदीरशाही, यंत्रणेची मात्र झोप उडाली नाही
Bhandara District General Hospital Rat : भंडारा जिल्हा रूग्णालय गेल्या दोन-तीन वर्षात सातत्याने चर्चेत आहे. आता आरोग्य यंत्रणेची अनास्था आणि ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. येथे उंदरांनी उच्छाद मांडला आहे. याविरोधात रुग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सर्वसामान्य जनतेला उपचार आणि आरोग्यविषयक सेवा देणारे मुख्य केंद्र असलेल्या मुख्यालयातील भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात सध्या उंदरांनी उच्छाद घातला आहे. हे सर्वसामान्य रुग्णालय गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे. आता आरोग्य यंत्रणेची अनास्था आणि ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. येथे उंदरांनी उच्छाद मांडला आहे. रूग्णांच्या आरोग्याशी आणि जीविताशी खेळण्याचा प्रकार संबंधित विभागाकडून सुरू असल्याची ओरड होत आहे. यामुळे इतर आजार वाढीस लागण्याची भीती नातेवाईक व्यक्त करत आहे. याविरोधात रुग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उंदरांचा बंदोबस्त लावावा अशी मागणी करण्यात येत आहे.
उंदारांच्या टोळीचा कहर
जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयात उंदरांचा कहर सुरू आहे. जिल्हा रूग्णालयातील रूग्ण कक्षात त्यांनी उच्छाद मांडला. उपचारासाठी भरती असलेल्या रूग्णांच्या अंगावरून अक्षरशः आठ ते दहाच्या संख्येत असलेल्या उंदराची टोळी धुमाकूळ घालत असल्याचे दृश्य समोर आल्याने नातेवाईकांच्या अंगावर काटा आला आहे. आरोग्य यंत्रणा मात्र अद्यापही साखर झोपेत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
अन्न पदार्थावर उंदरांचा ताव
रुग्णांच्या डब्यातील आणि पिशव्यातील खाद्यपदार्थांचा फडसा पाडतानांचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून एक प्रकारे अप्रत्यक्षपणे रूग्णांच्या आरोग्याशी आणि जीविताशी खेळण्याचा प्रकार संबंधित विभागाकडून सुरू असल्याची ओरड होत आहे. यामुळे इतर आजार वाढीस लागण्याची भीती नातेवाईक व्यक्त करत आहे.
पायाला कडाडून चावा
उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ही घटना चिंताजनक आहे. दोन दिवसांपूर्वी रूग्णासोबत असलेल्या व्यक्तीच्या पायाला उंदराने चावा घेतल्याचे सांगण्यात आले. व्हिडीओमध्ये उंदीर बेड वर आणि खाली धावताना दिसत आहेत. ब्लँकेट पांघरून झोपलेल्या रुग्णांच्या बेडवर उंदीर उड्या मारता दिसत आहेत. उंदीर रुग्णांना चावू शकतात आणि त्यांच्या शेजारी ठेवलेले अन्न आणि औषधे देखील खातात. हे उंदीर अतिशय धोकादायक आहे. लवकर उंदरांचा बंदोबस्त लावावा अशी मागणी आता नातेवाईकांकडून होत आहे.