Mumbai | राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नात भुजबळ फॅमिलीची हजेरी

जयंत पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव राजवर्धन आणि मिहीर दोशी यांची कन्या रिया यांचा विवाह समारंभ आज मुंबई पार पडला.

Mumbai | राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नात भुजबळ फॅमिलीची हजेरी
जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नातील फोटो
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 9:31 PM

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाचं आज मुंबईत लग्न छोटेखानी पद्धतीनं पार पडलं. या लग्नाला भुजबळ फॅमिलीनं हजेरी लावली होती. जयंत पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव राजवर्धन आणि मिहीर दोशी यांची कन्या रिया यांचा विवाह समारंभ आज मुंबई पार पडला. जयंत पाटील यांनी हा विवाह सोहळा कोरोनामुळे छोटेखानी पद्धतीनं करण्यात येत असल्याची माहिती फेसबुकवरुन दिली होती.

जयंत पाटील यांची फेसबुक पोस्ट

जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला भुजबळ कुटुंबीयांनी विशेष उपस्थिती लावली होती. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या विवाह सोहळ्यास उपस्थित होते. यावेळेस भुजबळ यांनी नवविवाहित जोडप्यास शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्वल वाटचालीस सदिच्छाही दिल्या. यावेळी भुजबळांसोबतच माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ. शेफाली भुजबळ यादेखील उपस्थित होत्या.

आयफेल टॉवरवर प्रपोझ, मुंबईत लग्न

दरम्यान, ऑक्टोबरमहिन्यात खुद्द शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या मुलानं आयफेल टॉवरवर जाऊन मुलीला प्रपोझ केल्याचा किस्सा सांगितला होता. त्यावेळी शरद पवार यांनी म्हटलं होतं की,

जयंतरावाच्या मुलानं पॅरिसच्या आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोज केलं. दोघांचं जुळलं, पण आमची पोरं काय करतील याचा नेम नाही. या नात्याला दोन्ही बाजूंनी मान्यता मिळली आहे. आता, आम्ही वाळवा, इस्लामपूरपर्यंत मर्यादित राहिलो नाही. थेट पॅरिसलाच जातो. ठिकाणं इंटरनॅशनल असलं, तरीही दोघं स्थानिकच आहेत. त्यामुळे त्यांचं लग्न इथंच होईल.

दरम्यान, आज वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतच छोटेखानी पद्धतीनं जयंत पाटील यांच्या मुलाला विवाह सोहळा संपन्न झाला.

इतर बातम्या –

मोठी बातमी! समीर मेघेंसह अधिवेशनातील 32 जणांना कोरोनाची लागण, 32 जणांमध्ये कुणाकुणाचा समावेश?

Salman Khan | सलमान खानला चावलेल्या सापासोबत काय केलं? सलीम खान यांनी सांगितलं की…

Omicorn | महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा उच्चांक, मुंबईत सर्वाधिक रुग्ण, कुठे किती रुग्ण? वाचा सविस्तर

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.