Bhujbal on Rana : राणांनी लकडावालांकडून 80 लाख घेतल्याचा तपास मुंबई पोलीस अन् ईडीने करावा; भुजबळांची मागणी

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी युसूफ लकडावाला (Lakdawala) या दाऊदच्या माणसाकडून 80 लाख रुपये घेतल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याचा तपास मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) व ईडीनेही करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

Bhujbal on Rana : राणांनी लकडावालांकडून 80 लाख घेतल्याचा तपास मुंबई पोलीस अन् ईडीने करावा; भुजबळांची मागणी
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 3:43 PM

मुंबईः खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी युसूफ लकडावाला (Lakdawala) या दाऊदच्या माणसाकडून 80 लाख रुपये घेतल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याचा तपास मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) व ईडीनेही करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. भुजबळ आज जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहिले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्याचा चांगलाच समाचार घेतला. भुजबळ म्हणाले, मंत्री नवाब मलिक यांनी पाच लाखांचा जमीन व्यवहार केला म्हणून त्यांच्यावर ईडीने कारवाई केली. ते दाऊदच्या माणसाकडून खरेदी केली असे म्हणतात. मात्र, त्यात कुठेही काहीही दिसत नाही, पण नवनीत राणा यांनी सरळसरळ 80 लाख रुपये घेतले आहेत. त्याची कागदपत्रे खासदार संजय राऊत यांनी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्या मागासवर्गीय नाहीत…

भुजबळ म्हणाले की, नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला यांच्याकडून 80 लाख रुपये घेतले. ते कशासाठी घेतले, कुणाच्यावतीने घेतले, याचीही मुंबई पोलिसांनी व बाकीच्या यंत्रणांनीही चौकशी करायला हवी. नवनीत राणा या मागासवर्गीय आहेत. याबाबत हायकोर्टाने नकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या मागासवर्गीय नाहीत, असे हायकोर्ट बोलत आहे. त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात अपील केले आहे. मुळात त्या मागासवर्गीय आहेत का हे प्रश्नचिन्ह आहे, असेही छगन भुजबळ म्हणाले.

तुमच्यावर काय अन्याय झाला…

भुजबळ म्हणाले की, नवनीत राणा आमच्यावर अन्याय केला असे बोलत आहेत. काय अन्याय केला, असा सवाल करतानाच तुम्ही दिवसभर काय करत होतात हे सर्वांनी पाहिले आहे, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला. पोलीस ठाण्यात अन्याय झाला म्हणतात, मग पोलिसांविरुद्ध त्यांची तक्रार नाही, असे पोलीस रेकॉर्डमध्ये नमूद असल्याचे पत्र छगन भुजबळ यांनी दाखवतानाच मग यांच्यावर अन्याय काय झाला, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

कंबोज म्हणतात पवारांचेही संबंध…

संजय राऊत, अहमद पटेल, शरद पवार , राजीव गांधी या साऱ्यांचे युसूफ लकडावालांशी चांगले संबंध होते आणि आहेत. त्यांच्या महाबळेश्वरच्या हॅाटेलवर संजय राऊत अनेकदा जाऊन राहतात. लकडावालांचे मातोश्रीवर नेहमीच येणे – जाणे होते, असा गौप्यस्फोट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. आपल्या दाव्यासाठी त्यांनी काही फोटोचे पुरावेही दिलेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर लकडावालाप्रकरण तापणार आहे.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.