‘ज्योतिबाच्या नावानं चांगभलं’, कोल्हापुरात कोठारे कुटुंबाकडून “दख्खनचा राजा ज्योतिबा” मालिकेचं भूमीपूजन
स्टार प्रवाह प्रस्तुत आणि कोठारे व्हिजन्सची निर्मिती असलेल्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे (Bhumi Pujan of Dakkhancha Raja Jyotiba serial).
मुंबई : स्टार प्रवाह प्रस्तुत आणि कोठारे व्हिजन्सची निर्मिती असलेल्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे (Bhumi Pujan of Dakkhancha Raja Jyotiba serial). या आगामी मालिकेचा भूमीपूजन सोहळा नुकताच कोल्हापुर चित्रनगरीत पार पडला. या खास प्रसंगी महेश कोठारे यांच्यासह आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे आणि निलिमा काठारे असं संपूर्ण कोठारे कुटुंब उपस्थित होते.
कोठारे व्हिजन्सचं कोल्हापुराशी तसं खूप जुनं आणि घट्ट नातं आहे. ज्योतिबाचं देवस्थान देखील या कोल्हापूर नगरीतच आहे. त्यामुळेच मालिकेचं शूटिंगही कोल्हापुरात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोल्हापूर चित्रनगरीत ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या आगामी मालिकेचा भव्यदिव्य सेट उभा करण्यात येत आहे. लवकरच याचं काम पूर्ण होऊन शुटिंगला सुरुवात होणार आहे.
स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्सची टीम या नव्या पौराणिक मालिकेसाठी जोमाने कामाला लागली आहे. लवकरच शूटिंगचा श्रीगणेशा होणार असून ज्योतिबाची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हेही वाचा :
कॉस्ट्यूम, मेकअपचे कमीत कमी शेअरिंग, चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी गाईडलाईन्स काय?
सोनाक्षी सिन्हावर आक्षेपार्ह कमेंट करणं भोवलं, औरंगाबादेतील तरुणाला अटक
प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट आणि रिया चक्रवर्तीचे ‘कथित’ व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
Bhumi Pujan of Dakkhancha Raja Jyotiba serial