AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात मोठा धमाका, नॉमिनेशन टास्कमध्ये मैत्रीची परीक्षा!

‘बीबी अदालत’मध्ये अभिनव शुक्लाला आरोपी करण्यात आले होते. तो या घरात राहण्यासाठी योग्य आहे का?, असा प्रश्न करण्यात आला होता.

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात मोठा धमाका, नॉमिनेशन टास्कमध्ये मैत्रीची परीक्षा!
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 11:43 AM

मुंबई :बिग बॉस’च्या घरात गेल्या भागात ‘बीबी अदालत’चे शेवटचे सेशन पार पडले. घरात प्रवेश केलेल्या पत्रकारांनी बेघर होण्यासाठी एका स्पर्धकाला नॉमिनेट (Nomination Task) केले. यादरम्यान केवळ नॉमिनेशनच नाही तर, स्पर्धकांच्या मैत्रीचीही परीक्षा ‘बिग बॉस’ने (Bigg Boss) घेतली. या टास्कदरम्यान स्पर्धकांनी आपली मैत्री टिकवण्याचा प्रत्येक प्रयत्न केला. ‘बीबी अदालत’च्या या सेशनमध्ये एजाज, पवित्रा, जास्मीन, अली आणि रुबिना यांना प्रश्न करण्यात आले होते. तर, पुढच्या भागात इतर स्पर्धकांची शाळा घेण्यात आली (Bigg Boss 14 Latest update Biggest Nomination Task).

‘बीबी अदालत’मध्ये अभिनव शुक्लाला आरोपी करण्यात आले होते. तो या घरात राहण्यासाठी योग्य आहे का?, असा प्रश्न करण्यात आला होता. मात्र, या प्रश्नावर त्याने आपण अयोग्य उमेदवार असल्याचे म्हटले. यानंतर न्यायाधीश म्हणून आलेली फराह खान त्याला घरातून बाहेर जाण्याविषयी विचारते. यानंतर तो शांत होतो. अभिनवनंतर जान आणि निक्कीची शाळा घेण्यात आली. यावेळी पुन्हा एकदा जान कुमार सानूची पोलखोल करण्यात आली. त्याच्या बद्दलच्या गोष्टी ऐकून घरातल्या इतर स्पर्धकांना पुन्हा धक्का बसला आहे. या नॉमिनेशन टास्कमध्ये शार्दुल पंडितला नॉमिनेट करण्यात आले आहे.

पवित्रा-एजाजची गळाभेट

सगळ्यांसमोर एकमेकांचे वैरी बनून वावरणारे एजाज आणि पवित्रा एकमेकांची गळाभेट घेत असताना अलीने त्यांना पाहिले. चिडलेल्या अलीने ही गोष्ट घरातील सगळ्या स्पर्धकांना सांगितली. तर, नॉमिनेशनमध्ये नाव आल्याने शार्दुल प्रचंड नाराज झाला आहे. त्याने यासंदर्भात निक्की आणि पवित्राशी चर्चादेखील केली (Bigg Boss 14 Latest update Biggest Nomination Task).

मैत्री टिकणार की तुटणार?

नॉमिनेशन टास्क अधिक रंजक बनवण्यासाठी चक्क स्पर्धकांच्या मैत्रीची परीक्षा घेण्याचे बिग बॉसने ठरवले आहे. या टास्कनुसार अलीला या टास्कमध्ये सुरक्षित होण्यासाठी जास्मीन भसीनची लाडकी बहुली अभिनवला द्यायची आहे. जान कुमार सानूला वाचवण्यासाठी निक्कीला तिच्या आईचे ब्लँकेट फाडावे लागले. रुबिनाला सुरक्षित करण्यासाठी बिग बॉसने जास्मीनला अलीला नॉमिनेट करण्यास सांगितले. मात्र, जास्मीनने अलीला नॉमिनेट न केल्याने रुबिना नॉमिनेट झाली आहे. मात्र, अलीला वाचवण्यासाठी रुबिनाने तिच्या वस्तूंची कुर्बानी दिली आहे. आता पुढे काय होणार आणि कोणाची मैत्री टिकणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लगून राहिले आहे.

(Bigg Boss 14 Latest update Biggest Nomination Task)

Bigg Boss 14 | रुबिना दिलैक पाठोपाठ कविता कौशिकचा ‘बिग बॉस’वर गंभीर आरोप!

 प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘बिग बॉस 14’च्या घरात ‘भूतं’ अवतरणार!

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.