Bigg Boss 14 |रूबीना-जास्मीनच्या मैत्रीत फूट, अभिनव आणि रूबीनामध्येही वाद बिग बॉसच्या घराचे चित्र पालटले!

'बिग बॉस' 14च्या प्रत्येक हंगामात घरातील सदस्य एकमेंकांबरोबर मैत्री करतात. मात्र, कधीकधी ती मैत्री क्षणातच मोडते. ‘बिग बॉस 14’च्या घरात जास्मीन भसीन आणि रुबीना दिलैकची घट्ट मैत्री होती.

Bigg Boss 14 |रूबीना-जास्मीनच्या मैत्रीत फूट, अभिनव आणि रूबीनामध्येही वाद बिग बॉसच्या घराचे चित्र पालटले!
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 1:16 PM

मुंबई : ‘बिग बॉस’ 14च्या प्रत्येक हंगामात घरातील सदस्य एकमेंकांबरोबर मैत्री करतात. मात्र, कधीकधी ती मैत्री फक्त क्षणातच मोडते. ‘बिग बॉस 14’च्या घरात जास्मीन भसीन आणि रुबीना दिलैकची घट्ट मैत्री होती. मात्र, कर्णधारपदासाठीच्या खेळात जास्मीन आणि रूबीनाच्या मैत्रीत फूट पडलेली बघायला मिळत आहे. जास्मीनच्या टीमला स्वयंपाकघराची जबाबदारी देण्यात आली होती. तर, रुबीनाच्या टीमला बेडरूमची जबाबदारी देण्यात आली होती. (Bigg Boss 14 Rubina Jasmin’s friendship breaks up, Big Boss’s house changed)

टास्क दरम्यान दोन्ही संघात जोरदार भांडणे झाली आहेत. निक्कीची प्रकृती बिघडल्यामुळे तिला बेडरूममध्ये झोपण्याची परवानगी रूबीनाची टिम देते. मात्र, निक्की बेडरूममधून साहित्याची चोरी करताना दिसते. यामुळे रूबीना आणि तिची टिम निक्कीला बेडरूमच्या बाहेर जाऊ देत नाहीत. तिला बेडरूममध्येच बंद करतात. यामुळे रूबीना आणि जास्मीनच्या टिममध्ये जोरदार भांडणे होतात. जास्मीन आणि रुबीना प्रमाणेच अभिनव आणि जास्मीनची मैत्री देखील निक्कीमुळे बिघडत चालली आहे. निक्की बेडरूममध्ये आल्यानंतर अभिनव स्वयंपाक घरात जाण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून जास्मीन अभिनवला स्वयंपाक घरात प्रवेश करू देत नाही. यामुळे अभिनव आणि जास्मीनमध्ये भांडण सुरू होतात.

बिग बॉसच्या घरात सामील झालेले नवरा-बायको अभिनव आणि रूबीना यांच्यामध्ये देखील भांडणे बघायला मिळत आहेत. केवळ मैत्रीच नव्हे तर, बिग बॉसने दिलेल्या नव्या टास्कमध्ये अभिनव आणि रुबीना यांच्या नात्यातही फूट पडलेली दिसली. अभिनव रुबीनाला म्हणतो की, ‘रुबी, तुला या प्रकरणात बोलण्याची काय गरज होती?’, यावर रुबीना त्याला उत्तर देते की मी राहुलशी बोलत होते. अभिनव रूबीनाला म्हणतो की, या प्रकरणावर कोणतेही स्पष्टीकरण मला देऊ नको, हा तुझा मूर्खपणा आहे. आता काही बोलू नकोस, असे अभिनव तिला रागाने म्हणाला. कविता आणि अलीमध्ये जोरदार भांडण अली गोनी, अभिनव शुक्ला आणि रुबीना यांनी कॅप्टन कविताच्या नकळत फ्रीजमधून सॉफ्ट ड्रिंक चोरी करून बिग बॉसच्या घराच्या नियमांचे उल्लंघन केले होते. बिग बॉस कविताला म्हणाले होते की, घरातील ज्या सदस्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, असे तुम्हाला वाटते अशा सदस्याचे वैयक्तिक सामान उचलून बिग बॉसच्या स्वाधीन करावे. यावेळी कविता अलीमध्ये जोरदार भांडणे झाली होती. अभिनव आणि कविता फ्रेंड्स विथ बेनिफिट? अलीने बिग बॉसने दिलेल्या बॉक्सला लाथ मारल्यामुळे कविताला राग आला होता. कविता बिग बॉसला म्हणते की, अशा हिंसक वातावरणात मी घरात राहू शकत नाही. त्याचवेळी रुबीना कविताला बोलण्यासाठी जाते. त्यावेळी कविता रुबिनाला सांगते की, अभिनव आणि मी फ्रेंड्स विथ बेनिफिट होतो. तुला कदाचित अभिनवने कधी सांगितले नसेल. त्यावेळी रूबीना कविताला म्हणते मला माहिती आहे. मात्र, हे ऐकून घरातील इतर सदस्यांना धक्का बसला होता. रूबीना अभिनवला म्हणते की, तु मला कधी सांगितले नाही की, तु आणि कविती फ्रेंड्स विथ बेनिफिट होतात. यावरून अभिनव आणि रूबीनामध्ये वाद झाला होता.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | बिग बॉसच्या घराचे दोन भागात विभाजन, घरात पुन्हा एकदा हंगामा

 Bigg Boss 14 | ‘बिग बॉस 14’च्या घरात एकता कपूरची धमाकेदार एंट्री, नवा ट्विस्ट खेळ बदलणार!

(Bigg Boss 14 Rubina Jasmin’s friendship breaks up, Big Boss’s house changed)

विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....