Bigg Boss | ‘बिग बॉस’च्या घरात पहिले एलिमिनेशन, सारा गुरपाल घराबाहेर जाणार?

सारा गुरपाल पंजाबमध्ये हिमांशी आणि शहनाझपेक्षा प्रसिद्ध असल्याने तिला संधी देण्यात आली होती. प्रेक्षकांच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षा देखील वाढल्या होत्या.

Bigg Boss | ‘बिग बॉस’च्या घरात पहिले एलिमिनेशन, सारा गुरपाल घराबाहेर जाणार?
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 7:09 PM

मुंबई :बिग बॉस’च्या घरात सध्या गोंधळ सुरू झालेला आहे. घरातील पहिले एलिमिनेशन पार पडल्याचे कळते आहे. शनिवार आणि रविवारी ‘बिग बॉस’चा (Bigg Boss) ‘विकेंड वार’ पार पडला. पहिल्या दिवशी सलमान खानने स्पर्धकांचे कौतुक केले. मात्र, दुसऱ्या दिवशीच्या भागात त्याने नव्या स्पर्धकांना पद्धतशीर खेळण्याचा इशारा दिला आहे. असे न केल्यास पुढच्या 2 आठवड्यात घराबाहेर पडावे लागेल, असा इशारा त्याने स्पर्धकांना दिला आहे. दरम्यान, या खेळातून सारा गुरपाल (Sara Gurpal) बेघर झाल्याचे कळते आहे. (Bigg Boss 14 Sara Gurpal Eliminated in First Elimination round)

‘विकेंड वार’मध्ये सलमानने स्पर्धकांना आपापल्या बॅगा भरून घराबाहेर जाण्यास सांगितले होते. आता यापैकी कोणी तरी एक घराबाहेर जाणार हे नक्की झाले आहे. तर, मिळालेल्या माहितीनुसार ती स्पर्धक सारा गुरपाल (Sara Gurpal) असणार आहे. सारा ‘बिग बॉस’च्या या पर्वाच्या घराबाहेर पडणारी पहिली स्पर्धक ठरणार आहे. तूफानी सिनिअर्सनी एकमताने साराला घराबाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रेक्षकांची उत्कंठा वाढणार

सारा गुरपाल (Sara Gurpal) घराबाहेर होणार असल्याचे वृत्त जरी असले, तरी नेमके काय घडणार हे सोमवारच्या (12 ऑक्टोबर) भागात कळणार आहे. सारा गुरपाल बिग बॉसच्या घरात सक्रिय नसल्याचे म्हणत सलमानने तिला बोल देखील लावले होते. तर, तिच्या घरातील सहकार्यावर तूफानी सिनिअर्सदेखील नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळाले. एका टास्क दरम्यान साराला ‘इसमे वो बात नही’ या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले होते. (Bigg Boss 14 Sara Gurpal Eliminated in First Elimination round)

बिग बॉसच्या घरात पंजाबी तडका

दरवर्षी बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात एका तरी पंजाबी चेहऱ्याला संधी दिली जाते. गेल्या पर्वात पंजाबच्या हिमांशी खुराना आणि शहनाझ गिलने घराला ‘पंजाबी’ तडका लावला होता. या दोघीही स्पर्धेत फार काळ टिकल्या होत्या. सारा गुरपाल पंजाबमध्ये हिमांशी आणि शहनाझपेक्षा प्रसिद्ध असल्याने तिला संधी देण्यात आली होती. प्रेक्षकांच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षा देखील वाढल्या होत्या. परंतु, पहिल्याच आठवड्यात प्रेक्षक तिच्यावर नाराज असल्याचे चित्र दिसले.

निक्की तंबोली ‘विशेषाधिकार’ मिळवणारी पहिली स्पर्धक

‘विकेंड का वार’ भागाच्या सुरुवातीस स्पर्धकांसह सलमान खाननेदेखील निक्की तंबोलीचे कौतुक केले. घरात सगळ्यात सक्रिय स्पर्धक निक्कीच असल्याचे सलमानने म्हटले. विशेषाधिकार मिळवण्यासाठीच्या खेळात पवित्रा पुनिया आणि निक्की तंबोली या दोघी विजेत्या ठरल्या होत्या. मात्र, बिग बॉसने दोघींपैकी एकीची निवड करण्याचा अधिकार तूफानी सिनिअर्सकडे सोपवला. यावर एकमताने निक्कीचे नाव घेतले गेल्याने, या पर्वात विशेषाधिकार मिळवणारी निक्की तंबोली पहिली स्पर्धक ठरली आहे.

संबंधित बातम्या :

Bigg Boss 14 | तूफानी सिनिअर्सला मोठी टक्कर, निक्की तंबोलीकडे घराचे ‘विशेषाधिकार’!

(Bigg Boss 14 Sara Gurpal Eliminated in First Elimination round)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.