Bigg Boss 14 | ‘वीकेंड का वार’मध्ये होस्ट सलमान खानकडून स्पर्धकांची शाळा!

लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘बिग बॉस’चे 14वे (Bigg Boss 14) पर्व सध्या चांगलेच रंगात आले आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत.

Bigg Boss 14 | ‘वीकेंड का वार’मध्ये होस्ट सलमान खानकडून स्पर्धकांची शाळा!
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 2:56 PM

मुंबई : लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘बिग बॉस’चे 14वे (Bigg Boss 14) पर्व सध्या चांगलेच रंगात आले आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत. मागील वीकेंड वारमध्ये सलमान खान घरातील सदस्यांवर चिडला होता. मात्र, यावेळी सलमान खान तेवढा चिडला नाही. परंतु जान कुमार सानूबद्दल राहुल वैद्यने केलेल्या विधानावर राहुल वैद्यला सलमान खानने चांगलेच झापले. त्यानंतर जास्मीन भसीनला देखील सलमान खानने इशारा दिला. (Bigg Boss 14 Weekend Ka War Salman Khan Bigg Boss house)

या वीकेंड वारमध्ये सलमान खान रुबिना दिलैक हिला काय बोलतो, याकडे सर्वांचेच लक्ष होते. यावर सलमान खान रुबिना दिलैक तु चुकीच्या दिशेला जात आहे, असे म्हणतो याबद्दल रुबिना दिलैक हिने सलमान खानला समजवण्याचा खुप प्रयत्न केला पण सलमान खानने तिच्याकडे दुर्लक्ष केले. रुबिना दिलैक हिने बिग बॉस भेदभाव करत असल्याता आरोप केला होता. विशेष म्हणजे रुबिना दिलैकने दुसऱ्यांदा हा आरोप केला होता. यापूर्वीही ‘बिग बॉस सीझन 13’मध्ये रश्मी देसाई आणि असिम रियाझ यांनी अशाच प्रकारचा आरोप केला होता. आता 14व्या पर्वामध्येही बिग बॉसवर भेदभाव करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राहुल वैद्य जान कुमार सानूला म्हणाला होता की, जान कुमार सानू याची स्वता:ची अशी काहीच ओळख नाही. त्याचे वडील खुप मोठे गायक आहेत. ‘बिग बॉस 14’मध्येही तो त्याच्या वडीलांच्या नावामुळेच आला आहे. त्याचे स्वत: चे काहीच कर्तृत्व नाही. राहुल वैद्यच्या विधानावर सलमान खानने त्याला चांगलेच सुनावले. ‘बिग बॉस’च्या घरात येणारा प्रत्येक सदस्य स्वत:च्या कर्तृत्वावरच येतो. जान कुमार सानूही स्वत:च्या कर्तृत्वावरच आला आहे. सलमान खान म्हणाला की, बॉलिवूडमध्ये असे बरेच अभिनेता आणि अभिनेत्री आहेत की, त्यांनी स्वत:च्या कर्तृत्वावर आपले नाव मोठे केले आहे. यानंतर अशाप्रकारचे वक्तव्य परत ‘बिग बॉस’ घरात खपून घेतले जाणार नसल्याचे सलमान खानने सांगितले. ‘बिग बॉस’च्या घरामध्ये एकतर्फी प्रेम प्रकरण सुरू झाले आहे. पवित्रा पुनियाला एजाज खान आवडत आहे. कविता कौशकला बोलताना पवित्रा पुनिया सांगते की, मला एजाज खान आवडतो, पण माझ्याबद्दल त्यांच्या मनात काय आहे, ते मला माहिती नाही. एजाज खानला पवित्राच्या नावाने निक्की तांबोळी, जान कुमार सानू, कविता कौशिक चिडवताना दिसतात. कविता कौशिक एजाज खान पवित्रा पुनियाबद्दल बोलते आणि सांगते की, पवित्रा पुनियाला तु आवडतो. यावर एजाज खान सरळ म्हणतो की, आमच्या दोघांच्या नात्याबद्दल तुला माहिती आहे, तिचे आणि माझे किती भांडण होतात आणि मला पवित्रा पुनिया आवडत नाही. त्यानंतर कविता कौशिक एजाज खानला फोर्स करते. पण तो सरळ म्हणतो की, मी इथे फक्त खेळण्यासाठी आलो आहे. मला माझे लक्ष फक्त खेळावर ठेवायचे आहे. मी येताना इथे एकटा आलो होतो आणि जाताना पण एकट्यालाच जायचे आहे. मी प्रेमाच्या भानगडीत पडलो तर सर्व विसरून जातो, असे म्हणत पवित्र पुनिया आपल्याला आवडत नसल्याचे त्याने सांगितले.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात नेपोटिझमचे वादळ, राहुल वैद्य-जान कुमार सानूमध्ये खडाजंगी!

Bigg Boss 14 | जान सानूच्या ‘भाषावादा’नंतर ‘बिग बॉस’च्या घरात वाजले ‘झिंगाट’ गाणे!

(Bigg Boss 14 Weekend Ka War Salman Khan Bigg Boss house)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.