दिल्ली-बिहारमध्ये ‘बंदी सरकार’, आता परिवर्तन घडवलंच पाहिजे; सोनिया गांधी यांचा घणाघात

बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतील केंद्र सरकारसह बिहार सरकारवर घणाघाती हल्ला चढविला आहे.

दिल्ली-बिहारमध्ये 'बंदी सरकार', आता परिवर्तन घडवलंच पाहिजे; सोनिया गांधी यांचा घणाघात
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 11:01 AM

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असतानाच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतील केंद्र सरकारसह बिहार सरकारवर घणाघाती हल्ला चढविला आहे. नोटाबंदी, टाळेबंदी, व्यापारबंदी, आर्थिकबंदी, कृषीबंदी, रोजीरोटी-रोजगार बंदी करण्यावर बिहार आणि दिल्लीतील सरकारचा भर असून ही दोन्ही सरकारे म्हणजे ‘बंदी सरकार’ आहेत, असा टोला लगावतानाच आता बिहारमध्ये परिवर्तन घडवलंच पाहिजे, असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे. (Bihar Assembly Election 2020: Sonia Gandhi video message Attacks BJP and JDU )

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ जारी करून हा घणाघाती हल्ला चढवला आहे. केंद्रातील मोदी सरकारने आणि बिहारमधील नितीशकुमार सरकारने जनतेवर केवळ ‘बंदी’ लादण्यापलिकडे काहीही केलं नाही. नोटाबंदी, टाळेबंदी, व्यापारबंदी, आर्थिकबंदी, कृषीबंदी, रोजीरोटी-रोजगार बंदी करण्यावरच या दोन्ही सरकारांचा भर राहिला आहे. त्यामुळे या बंदी सरकार विरोधात बिहारची जनता उभी ठाकली असून आता बदल घडवण्याची वेळ आली आहे, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

आज बिहारचे सत्ताधीश अहंकारात बुडून गेले असून विकासाच्या मार्गापासून कोसो मैल दूर गेले आहेत. त्यांच्या वृत्ती आणि प्रवृत्तीत बदल झाला आहे. मजदूर, शेतकरी, तरुणांना नैराश्याने गाठले आहे. त्रस्त झाले आहेत. अर्थव्यवस्था डबघाईला आली असून त्याचा लोकांवर परिणाम झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.

बिहार सरकारने दलित आणि महादलितांना वाऱ्यावर सोडलं आहे. इतर मागास समाजही सुख-सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे आता बिहारच्या जनतेने काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारच्या जनतेने महाआघाडीला मतदान करून बिहारमध्ये बदल घडवून आणावा, असं आवाहनही त्यांनी या व्हिडीओतून केलं आहे. सोनिया गांधी यांचा हा व्हिडीओ तब्बल पाच मिनिटाचा असून या व्हिडीओत त्यांनी केंद्र सरकारच्या अपयशापासून ते बिहार सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला आहे. तसेच या व्हिडीओतून त्यांनी शेतकरी, दलित, महिला अत्याचार, तरुण आणि बेरोजगारीच्या प्रश्नांना हात घालून बिहार आणि केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे. (Bihar Assembly Election 2020: Sonia Gandhi video message Attacks BJP and JDU )

संबंधित बातम्या:

“आली-आली-आली, गेली-गेली-गेली”, भाजप अध्यक्षांकडून प्रचारात बिहारमधील लहानपणीचा किस्सा

Sushant Singh Rajput | सुशांत प्रकरणात बिहारचे राजकारणी आपली पोळी भाजतायत, सर्व्हेचा दावा!

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 23 उमेदवार रिंगणात, कुणाचा फायदा आणि कुणाचा तोटा?

(Bihar Assembly Election 2020: Sonia Gandhi video message Attacks BJP and JDU )

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.