माजी मुख्यमंत्र्यांकडून माजी विधानसभा अध्यक्षांचा पराभव, जीतन राम मांझी 16 हजार 717 मतांनी विजयी
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान आवाम मोर्चाचे (हम) नेते जीतन राम मांझी 16 हजार 717 मतांनी विजयी झाले आहेत (Jitan Ram Manjhi beat Uday Narayan Chaudhari).
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत इमामगंज या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं. या मतदारसंघात कोण जिंकेल याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता होती. अखेर या मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान आवाम मोर्चाचे (हम) नेते जीतन राम मांझी 16 हजार 717 मतांनी विजयी झाले आहेत (Jitan Ram Manjhi beat Uday Narayan Chaudhari).
जीतन राम मांझी यांनी बिहारचे माजी विधानसभा अध्यक्ष आणि आरजेडीचे उमेदवार उदय नारायण चौधरी यांचा पराभव केला आहे. या मतदारसंघात मांझी आमदार होते. त्यांनी 2015 साली देखील याच मतदारसंघातून चौधरी यांचा पराभव केला होता. त्याआधी चौधरी चार वेळा या मतदारसंघात विजयी झाले होते (Jitan Ram Manjhi beat Uday Narayan Chaudhari). विशेष म्हणजे चौधरी 2005 ते 2015 या कालावधीत बिहार विधानसभेचे अध्यक्ष होते.
विशेष म्हणजे दोघी दलित नेते आहेत. दोघांचे मोठ्या संख्येत समर्थक आहेत. इमामगंज मतदारसंघ हा उदय नारायण चौधरी यांचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र, मांझी यांनी गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात विजय मिळवला. त्यामुळे चौधरी यावेळी मांझी यांच्याकडून आपल्या बालेकिल्ल्यावरील सत्ता परत मिळवण्यात यशस्वी ठरतील का? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं. पण चौधरी पुन्हा आपला बालेकिल्लावर सत्ता स्थापन करण्यात अयशस्वी ठरले आहेत.
मांझी बिहारचे 23 वे मुख्यमंत्री बनले होते. त्यावेळी ते आरजेडी पक्षात होते. मात्र, अवघ्या दहा महिन्यात पक्षाने त्यांना नितीश कुमार यांच्यासाठी मुख्यमंत्री पद सोडण्याचा आदेश दिला. त्यांनी या गोष्टीचा विरोध केला. त्यांनी मुख्यमंत्री पद न सोडल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. अखेर 20 फेब्रुवारी 2015 रोजी बहुमत सिद्ध न करु शकल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी हिंदुस्तान आवाम मोर्चाची स्थापना करुन एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, 2018 साली त्यांनी एनडीएसोडून महागठबंधनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. महागठबंधनमध्ये समन्वय समिती स्थापन व्हावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र, समिती स्थापन होऊ न शकल्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीआधी महागठबंधनची साथ सोडली आणि एनडीएसोबत पुन्हा हातमिळवणी केली.
संबंधित बातम्या :