बिहार रणसंग्राम! जागा वाटपात महाआघाडीची ‘आघाडी’; राजद 144 तर काँग्रेस 70 जागांवर लढणार
राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे जागा वाटपही पूर्ण झाले आहे. या जागा वाटपात 144 जागा घेऊन काँग्रेसने सरशी घेतली असून काँग्रेसच्या वाट्याला 70 जागा आल्या आहेत. तर आघाडीच्या जागा वाटपात सीपीआयला 6, सीपीआय (एमएल)ला 19, सीपीएमला 4 जागा देण्यात आल्या आहेत.
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे जागा वाटपही पूर्ण झाले आहे. या जागा वाटपात 144 जागा घेऊन काँग्रेसने सरशी घेतली असून काँग्रेसच्या वाट्याला 70 जागा आल्या आहेत. तर आघाडीच्या जागा वाटपात सीपीआयला 6, सीपीआय (एमएल)ला 19, सीपीएमला 4 जागा देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय राजदच्या वाट्याला आलेल्या जागांमधून जेएमएम आणि व्हीआयपी या पक्षांना जागा सोडण्यात येणार आहेत. (Bihar assembly elections : RJD to contest 144 seats, Cong 70) यावेळी राजद नेते तेजस्वी यादव यांच्या नावावरच आघाडीचे नेते म्हणून शिक्कामोर्तबही करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे भाजप आघाडीतील जागा वाटपाचा पेच अद्यापही कायम आहे.
आज झालेल्या जागा वाटपानंतर तेजस्वी यादव यांची आघाडीचे नेते म्हणून निवड करण्यात आली असून त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राजद नेते लालूप्रसाद यादव हे तुरुंगात असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढली जाणारी बिहार विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे.
जागा वाटपानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या निवड समितीचे अध्यक्ष अविनाश पांडे यांनी महाआघाडीत वैचारिक मतभेद असल्याचं मान्य केलं. मात्र, बिहारच्या हितासाठी आम्ही एकत्रित आलो असल्याचं सांगितलं. 2015मध्ये बिहारमध्ये महाआघाडीलाच बहुमत मिळालं होतं. पण दुर्देवाने या बहुमताचं अपहरण करण्यात आलं. नितीश कुमार यांनी सवतासुभा रचत भाजपशी घरोबा केला. त्याचा बदला या निवडणुकीत जनता घेतल्या शिवाय राहणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
२८ ऑक्टोबर रोजी मतदान
दरम्यान, बिहार विधानसभेसाठी एकूण तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदान करण्यासाठी एका तासाचा अधिक वेळ देण्यात आलेला आहे. (Bihar assembly elections to be held in 3 phases, says CEC)
बिहारमध्ये विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबर रोजी संपत आहे. राज्यात एकूण 243 जागांसाठी निवडणूक होणार असून त्यापैकी 38 जागा अनुसूचित जातीसाठी आणि 2 जागा अनुसूचित जनजातीसाठी राखीव आहेत. बिहारमध्ये सध्या एकूण 7 कोटी 29 लाख मतदार आहेत. 2015 मध्ये ही मतदारसंख्या 6. 68 कोटी एवढी होती. म्हणजे यंदा जवळपास 68 लाख नव्या मतदारांची भर बिहारमध्ये पडली आहे. त्यामुळे हा नवमतदार कुणाच्या पारड्यात मतदान टाकणार? हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. हा नवमतदार बिहारच्या निवडणुकीचं गणित बदलू शकणार नसला तरी त्याचा या निवडणुकीवर नक्कीच प्रभाव जाणवेल असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. (Bihar assembly elections : RJD to contest 144 seats, Cong 70)
संबंधित बातम्या:
Bihar Election | बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबरला मतदान; 10 नोव्हेंबरला निकाल
Bihar Assembly Elections 2020 | बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर, तीन टप्प्यांत निवडणूक
(Bihar assembly elections : RJD to contest 144 seats, Cong 70)