Sushant Death Case | “मुंबई पोलिसांनी 50 दिवसांत काय केलं?” बिहार पोलिस महासंचालकांचा सवाल

महाराष्ट्राचे गृहसचिव फोन उचलत नाहीत, बिहार पोलिसांचे फोनही घेत नाहीत. पूर्ण संवाद मुंबई पोलिसांनी थांबवला आहे, असा आरोप गुप्तेश्वर पांडे यांनी केला.

Sushant Death Case | मुंबई पोलिसांनी 50 दिवसांत काय केलं? बिहार पोलिस महासंचालकांचा सवाल
Follow us
| Updated on: Aug 04, 2020 | 11:59 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी बिहारच्या पोलिस महासंचालकांनी मुंबई पोलिसांवर आगपाखड केली आहे. “मुंबई पोलिसांनी 50 दिवसांत काय केलं?” असा सवाल गुप्तेश्वर पांडे यांनी विचारला आहे. (Bihar DGP Gupteshwar Pandey slams Mumbai Police on Sushant Death Case)

बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “महाराष्ट्र पोलिसांना इतकाच अभिमान असेल. तर मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी 50 दिवसांत काय केलं? काय चौकशी केली, हे सांगावं. महाराष्ट्राचे गृहसचिव फोन उचलत नाहीत, बिहार पोलिसांचे फोनही घेत नाहीत. पूर्ण संवाद मुंबई पोलिसांनी थांबवला आहे” असा आरोप पांडे यांनी केला.

“सुशांत सिंह राजपूतला न्याय देणार. तपासासाठी मुंबईला आलेले पाटणा शहराचे एसपी विनय तिवारी यांना विलगीकरण का ठेवलं? एअरपोर्टवर इतके जण येतात, त्यांना विलगीकरणात ठेवलं जातं का? लोकांच्या मनातील शंका दूर करा” असेही गुप्तेश्वर पांडे म्हणाले.

दुसरीकडे, पाटणाचे पोलिस महानिरीक्षक संजय सिंह यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. बिहारचे एसपी विनय तिवारी यांना गृह विलगीकरणातून सोडण्याची विनंती करण्यात आली आहे.

देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी नियमावली ठरवण्यात आली आहे, त्यानुसार पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांना होम क्वारंटाईन करण्यात आले, असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईला आलेल्या बिहारच्या एसपींना बळजबरीने क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला होता.

हेही वाचा : …तर माझ्या मुलाचा जीव वाचला असता, सुशांतच्या वडिलांचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

“सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या बिहारच्या अधिकाऱ्यांना क्वारंटाईन ठेवण्याची खेळी चुकीची आहे. यातून काहीतरी संशयास्पद असल्याचे दिसून येते. एनआयए, अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. आता वेळ आली आहे, केंद्राने हस्तक्षेप करावा” अशी मागणी बिहारमधील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केली.

संबंधित बातम्या :

Painless Death विषयी गुगल सर्च, स्किझोफ्रेनियाचीही माहिती, सुशांतने आत्महत्येपूर्वी काय काय केलं?

पाटण्याचे एसपी बळजबरीने क्वारंटाईन, बिहारच्या पोलिस महासंचालकांचा आरोप

(Bihar DGP Gupteshwar Pandey slams Mumbai Police on Sushant Death Case)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.