Bihar Election Result ! मतमोजणी धीम्यागतीने नाही, पण…; निकालाला उशीर का लागतोय? निवडणूक आयोगाने दिलं ‘हे’ कारण

बिहार विधानसभेचं चित्रं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत स्पष्ट होणार असून रात्री उशिरापर्यंत निकाल हाती येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (Bihar election counting to continue till late evening: Election Commission)

Bihar Election Result ! मतमोजणी धीम्यागतीने नाही, पण...; निकालाला उशीर का लागतोय? निवडणूक आयोगाने दिलं 'हे' कारण
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 2:13 PM

नवी दिल्ली: बिहार विधानसभेचं चित्रं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत स्पष्ट होणार असून रात्री उशिरापर्यंत निकाल हाती येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मतमोजणी धीम्या गतीने होत असल्यामुळेच निकालाला उशीर होत असल्याचं सांगण्यात येत असलं तरी निवडणूक आयोगाने मात्र, मतमोजणी धीम्यागतीने होत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मतमोजणी आहे त्या गतीनेच सुरू आहे. परंतु कोरोनामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली. त्यामुळे ईव्हीएम मशीनची संख्याही वाढली. त्यामुळेच मतमोजणी लांबणार असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. (Bihar election counting to continue till late evening: Election Commission)

निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतमोजणीबाबतच्या अफवांवर सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली. मतमोजणी धीम्यागतीने सुरू नाही. नेहमीच्या गतीनेच मतमोजणी सुरू आहे. परंतु, यंदा कोरोनामुळे मतदान केंद्र वाढवावी लागली. त्यामुळे मशीनही वाढल्या. शिवाय पोस्टल मतांमध्येही मोठ्याप्रमाणावर वाढ झाल्याने निकाल यायला वेळ लागत असल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे. कोरोनामुळे मतदान केंद्रांच्या संख्या 63 हजारावरून 1.26 लाखांवर गेली आहे. बिहारमध्ये एकूण 4.10 कोटी मतदान झालं. त्यापैकी 25 टक्के मतांची म्हणजे 1 कोटी मतांची मोजणी करण्यात आली आहे. अजून 3 कोटी मतांची मोजणी बाकी आहे. एकूण 55 केंद्रांवर मोजणी सुरू असून अजून 19 ते 51 फेऱ्यांपर्यंत मोजणी होऊ शकते, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल नेमका काय लागतो? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी एच.आर. श्रीनिवासन यांनीही निकाल येण्यासाठी संध्याकाळपर्यंतचा अवधी लागेल, असे स्पष्ट केले. बिहारमध्ये आतापर्यंत केवळ 20 टक्के मतांची मोजणी झाली आहे. अजूनही 3 कोटी 10 लाख मतांची मोजणी बाकी आहे. त्यामुळे नेमके चित्र स्पष्ट होण्यास सहा-सात वाजतील, असे एच.आर. श्रीनिवासन यांनी सांगितले.

एरवी बिहारमध्ये 73 हजार मतदान केंद्रे असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली होती. त्यामुळे यंदा एक लाखाहून अधिक मतदान केंद्रांवरील मतमोजणी करायची आहे. या केंद्रांवर मतमोजणीच्या कमीतकमी 23 ते जास्तीत जास्त 51 फेऱ्या पार पडू शकतात. त्यामुळे मतमोजणीला आणखी वेळ लागेल, अशी माहिती एच.आर. श्रीनिवासन यांनी दिली.

संबंधित बातम्या:

Bihar election: बिहारचा खरा निकाल अजून लागायचाय, 3 कोटी मतांची मोजणी बाकीच, अनेक मतदारसंघात काँटे की टक्कर

Bihar Election Result : मंगळावर जाणारे सॅटेलाइट नियंत्रित होऊ शकतात तर ईव्हीएम मशीन का हॅक होऊ शकत नाही?: उदित राज

Bihar election result 2020: भाजप ‘मोठा भाऊ’ ठरला तरीही मुख्यमंत्री नितीश कुमारच!, भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून स्पष्ट

(Bihar election counting to continue till late evening: Election Commission)

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...