AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election Result 2020 LIVE | बिहारच्या हायप्रोफाईल लढतींकडे देशाचं लक्ष, कुठे-कुठे कांटे की टक्कर?

बिहार विधानसभा निवडणूक निकालाचे सर्व लाईव्ह अपडेट फक्त टीव्ही 9 मराठीवर #tv9marathilive

Bihar Election Result 2020 LIVE | बिहारच्या हायप्रोफाईल लढतींकडे देशाचं लक्ष, कुठे-कुठे कांटे की टक्कर?
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 8:48 AM

Bihar Election Result 2020 LIVE पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल (Bihar Vidhansabha Election Result)अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बिहारमधील 243 मतदारसंघांचे निकाल जाहीर होणार असून अनेक जागांवर हायप्रोफाईल लढती होत आहेत. बहुतांश मतदारसंघात कांटे की टक्कर पाहायला मिळणार असून कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Bihar Election Result 2020 Key Candidates Result LIVE Updates)

राघोपूर – वैशाली जिल्ह्यातील राघोपूर जागेवर ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) उभे आहेत. त्यांच्यासमोर भाजपचे उमेदवार सतीश कुमार यांचे आव्हान आहे. सतीश कुमार यांनी राबडी देवी यांचा पराभव करुन ही जागा कोणे एके काळी जिंकली होती. मात्र गेल्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी मातोश्रींच्या पराभवाचा वचपा काढत सतीशकुमार यांच्या ताब्यातून जागा खेचून आणली. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याने तेजस्वींसाठी राघोपूरची जागा जिंकणे हे प्रतिष्ठेचे ठरणार आहे.

हसनपूर – तेजस्वी यादव यांचे मोठे भाऊ तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर जागेवर राजदचे उमेदवार आहेत. गतवेळी तेजप्रताप यादव यांनी महुआ मतदारसंघातून विजय मिळवला होता, परंतु यावेळी त्यांनी हसनपूर ही सुरक्षित जागा मानून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तेज प्रताप यांची दुरावलेली पत्नी ऐश्वर्या राय महुआमधून निवडणूक लढवू शकतात, अशी अटकळ होती. यानंतर तेज प्रताप यादव यांनी आपली जागा बदलली.

बांकीपूर – पाटणा जिल्ह्यातील बांकीपूर ही जागा यावेळी अनेक उमेदवारांमुळे चर्चेत आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र लव्ह सिन्हा (Luv Shatrughna Sinha) हे कॉंग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरले आहेत. भाजपचे चार वेळा आमदार नितीन नवीन यांच्याविरुद्ध ते लढत आहेत. लंडनमधून बिहारच्या राजकारणात दाखल झालेल्या पुष्पम प्रिया चौधरी (Pushpam Priya Chaudhari) स्वतःच्या प्लुरल्स पक्षातर्फे उमेदवार आहेत. याशिवाय ऑक्सफर्ड विद्यापीठाचे पदवीधर मनीष बारीयार हे अपक्ष उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवत आहेत.

इमामगंज- माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी आवामी मोर्चाचे अध्यक्ष जीतनराम मांझी (Jitan Ram Manjhi) इमामगंजमधून उमेदवार आहेत. या सीटवरुन मांझी विद्यमान आमदार आहेत. राजदने अनुसूचित जमातीचे प्रख्यात नेते उदय नारायण चौधरी यांना त्यांच्या विरोधात उभे केले आहे. चौधरी हे चार वेळा आमदार राहिले आहेत. चौधरी पूर्वी जेडीयूमध्ये होते, परंतु जीतन राम मांझी यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर 2015 मध्ये ते आरजेडीमध्ये दाखल झाले. या जागेवर राष्ट्रीय लोक समता पार्टीने जितेंद्र कुमार, तर लोजपने शोभा सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे.

डुमरांव – डुमरांव जागेवर जेडीयूचा ताबा आहे. यावेळी पक्षाने अंजुम आरा यांना उमेदवारी दिली आहे. अंजुम यांच्याविरुद्ध माकपचे उमेदवार अजितकुमार कुशवाह आणि अपक्ष उमेदवार शिवांग विजय सिंह उमेदवार आहेत. शिवांग विजय सिंह हे बक्सर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले (1952 आणि 1957) महाराजा कमलसिंग यांचे नातू आहेत.

ब्रह्मपूर – ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, पण यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. या जागेवर विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) चे जयराज चौधरी, राजदचे विद्यमान आमदार शंभूनाथ सिंह यादव आणि लोजपचे हुलास पांडेय उमेदवार आहेत. हुलास पांडेय हे बाहुबली आणि गुन्हेगारी प्रतिमेचे नेते आहेत. हुलास पांडेय हे बाहुबली नेते सुनील पांडेय यांचे भाऊ आहेत. (Bihar Election Result 2020 Key Candidates Result LIVE Updates)

किशनगंज – असदुद्दीन ओवैसी यांच्या ‘एमआयएम’ने किशनगंजच्या जागेवरील लढत रोचक बनवली आहे. MIM ने कमरुल होडा यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसकडून इजहारुल हुसैन आणि भाजपकडून स्वीटी सिंग यांना उमेदवारी मिळाली आहे. या जागेवर मुस्लिम मतदार अधिक आहेत. काँग्रेसचे उमेदवार जावेद आझाद यांनी 2010 आणि 2015 मध्येही जागा जिंकली होती.

सिकटी – सिकटीतून भाजपचे विद्यमान आमदार विजय मंडल हे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात राजदने शत्रुघ्न मंडल यांना उमेदवारी दिली आहे. अररिया जिल्ह्यातील या जागेवर सर्वांचे लक्ष आहे.

मधेपुरा – मधेपुरातून जन अधिकार पक्षाचे अध्यक्ष आणि स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर करणारे पप्पू यादव हे उमेदवार आहेत. या जागेवरुन जेडीयूने निखिल मंडल, तर राजदने चंद्रशेखर यांना तिकिट दिले आहे. शरद यादव यांची कन्या सुभाषिनी राव मधेपुरा जिल्ह्यातील बिहारीगंज मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आहेत.

संबंधित बातम्या :

तेजस्वी यादव बिहारचे नवे ‘बाहुबली’ होणार का?

निकालाआधीच पोस्टर झळकण्यास सुरुवात, तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख

(Bihar Election Result 2020 Key Candidates Result LIVE Updates)

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.