Bihar Election Result 2020 LIVE | जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची चिन्हं, लोजपसोबत 2005 पासूनच्या संघर्षाचा फटका?

जेडीयूचे प्रयत्न आणि लोजपच्या नकारांमुळे 2005 मध्ये बिहारमध्ये पुन्हा विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या

Bihar Election Result 2020 LIVE | जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची चिन्हं, लोजपसोबत 2005 पासूनच्या संघर्षाचा फटका?
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 10:31 AM

Bihar Election Result 2020 LIVE पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल (Bihar Vidhansabha Election Result) अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. सुरुवातीच्या कलांनुसार राजदला (RJD) शंभरपेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे, तर नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा जेडीयू (JDU) तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाण्याची चिन्हं आहेत. 2005 च्या विधानसभा निवडणुकांपासून लोजपसोबत असलेले वैर नितीशकुमारांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Bihar Election Result 2020 Nitish Kumar JDU may affected by dispute with Chirag Paswan LJP LIVE Updates)

बिहार निवडणुकीत लोक जनशक्ती पक्षाची (LJP) भूमिका काय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी एनडीएतून बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला होता. लोजपने भाजपसोबत वैर नसल्याचे सांगत केवळ जेडीयूविरोधात उमेदवार उभे केले होते. त्यामुळे लोजप-जेडीयूमधील मतभेदांचा फटका जेडीयूला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोक जनशक्ती पक्ष हा भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीसह बिहारमधील विरोधीपक्षांनीही केला होता. भाजप सत्तास्थापनेच्या वेळी जेडीयूला बाजूला सारुन लोजपला हाताशी धरेल, अशी अटकळही बांधली जात होती. आपली सत्ता आल्यास नितीशकुमारांना तुरुंगात पाठवू, असा इशाराही चिराग पासवान यांनी दिल्याने ते कुठल्याही परिस्थितीत भाजप-जेडीयूची साथ देणार नाहीत, असे मानले जाते. मात्र भाजपला एकट्याला सत्तास्थापन करायची झाल्यास पासवान ‘किंगमेकर’ ठरु शकतात.

2005 ची आठवण करुन देणारी निवडणूक

बिहारच्या राजकारणात 2005 हे वर्ष महत्त्वाचे ठरले होते. त्या वर्षी राज्यात दोन वेळा विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. कोणताही राजकीय पक्ष बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी होऊ शकला नव्हता. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे जेडीयू आणि लोजप यांच्यातील संघर्षाची परिस्थिती, हे होते. जेडीयू नेते नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा मिळवता आला नव्हता आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुन्हा निवडणुका घेण्याची वेळ आली होती.

नेमकं काय झालं होतं?

बिहारमध्ये 2005 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. फेब्रुवारी-मार्च महिन्यात राज्यात नवीन राजकीय समीकरणे निर्माण होऊ लागली. लोजपचे संस्थापक रामविलास पासवान यांनी लालू आणि नितीश यांच्याविरोधात एकट्याने लढा देण्याचा निर्णय घेतला होता. रामविलास पासवान यांनी जेडीयूबरोबर निवडणूक लढवावी आणि लालूंच्या राजदला पराभूत करण्यात साथ द्यावी, अशी नितीशकुमारांची इच्छा होती, परंतु पासवान यांनी नितीशकुमारांचे ऐकले नाही.

विधानसभा निवडणुकीत लोजपने 178 जागांपैकी 29 जागा जिंकल्या. परंतु कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. म्हणूनच, नितीश यांचे सत्तास्थापनेसाठी जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न सुरु झाले. नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा पासवान यांना आपल्यासोबत येण्यासाठी साद घातली, परंतु पासवान यांनी त्यांचा प्रस्ताव धुडकावला. मुस्लिम उमेदवारांला मुख्यमंत्री बनवण्याच्या निर्णयावर नितीशकुमार यांना पासवान यांचे पाठबळ हवे होते, परंतु लोजपने त्याला पाठिंबा देण्यास नकार दिला, असे म्हटले जाते.

जेडीयूचे प्रयत्न आणि लोजपचे नकार

निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती, पण राज्यात कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करता आले नाही. त्या काळात नितीशकुमारांवर लोजपच्या आमदारांची फोडाफोडी करण्याचा आरोपही करण्यात आला होता, मात्र त्यांनी हे दावे फेटाळले होते. जेडीयूचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि लोजपच्या सततच्या नकारांमुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2005 मध्ये राज्यात पुन्हा विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड मोठी दरी निर्माण झाली, त्याचा परिणाम या विधानसभा निवडणुकीतही स्पष्टपणे दिसून येतो. (Bihar Election Result 2020 Nitish Kumar JDU may affected by dispute with Chirag Paswan LJP LIVE Updates)

बहुमत न मिळाल्यामुळे बिहारमध्ये जेव्हा दुसर्‍यांदा विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या तेव्हा लोजपच्या 19 जागा कमी झाल्या. त्यांना केवळ 10 जागा जिंकता आल्या होत्या. परिणाम जेडीयू-भाजप युतीने बिहारमध्ये सरकार स्थापन केले. नितीशकुमार यांना पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली.

संबंधित बातम्या :

चिराग पासवान किंगमेकर ठरणार का? मतमोजणीचा ट्रेंड बदलला, भाजपची जोरदार मुसंडी

बिहारमध्ये ‘हे’ नेते ठरले औटघटकेचे मुख्यमंत्री; पाच दिवसांत पडले सरकार

बिहारच्या हायप्रोफाईल लढतींकडे देशाचं लक्ष, कुठे-कुठे कांटे की टक्कर?

(Bihar Election Result 2020 Nitish Kumar JDU may affected by dispute with Chirag Paswan LJP LIVE Updates)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.