नवोदित अभिनेत्याचा मृतदेह मुंबईतील घरी आढळला, कुटुंबीयांना हत्येचा संशय

अभिनेता अक्षत उत्कर्षचा मृतदेह रविवारी रात्री मुंबईतील त्याच्या राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला

नवोदित अभिनेत्याचा मृतदेह मुंबईतील घरी आढळला, कुटुंबीयांना हत्येचा संशय
Follow us
| Updated on: Sep 29, 2020 | 2:10 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ अद्याप उकलले नसतानाच बिहारमधून मुंबईत आलेल्या आणखी एका अभिनेत्याचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. नवोदित अभिनेता अक्षत उत्कर्षचा मृतदेह मुंबईतील राहत्या घरी संशयास्पद अवस्थेत आढळला आहे. अक्षतच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. (Bihar’s Actor Akshat Utkarsh found dead at Mumbai Home family suspect murder)

चित्रपट क्षेत्रात नशिब आजमावण्याच्या उद्देशाने अक्षत उत्कर्ष डोळ्यात स्वप्न घेऊन बिहारहून मुंबईला आला होता. गेल्या काही काळापासून तो अभिनय क्षेत्रात कार्यरत होता. मात्र अचानक त्याच्या निधनाच्या वृत्ताने कुटुंबीय आणि मित्र मंडळी हादरले आहेत.

अक्षतचा मृतदेह रविवारी रात्री मुंबईतील त्याच्या राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. अभिनेता त्रिपुरारी कुमार चौधरी याने त्याच्या मृत्यूची बातमी फेसबुकवर शेअर करत “बॉलिवूड, स्थानिग उद्योग बाहेरील लोकांना काम देत नाहीत आणि कलाकारांना आत्महत्या करण्यासाठी दबाव आणत आहेत” असा आरोप केला.

कोण होता अक्षत उत्कर्ष?

अक्षत उत्कर्ष बिहारमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील सिकंदरपूर गावचा रहिवासी होता. रविवारी मृत्यूच्या काही वेळ आधीच त्याचे वडिलांशी फोनवर बोलणेही झाले होते. त्यावेळी सगळे काही ठीक होते, मात्र रात्री उशिरा अचानक त्याच्या निधनाची बातमी आली. त्यामुळे शेवटच्या फोननंतर अचानक असे काय घडले, असा सवाल अक्षतचे मामा रंजित सिंह यांनी विचारला आहे.

मुंबई पोलिसांनी आपल्याला सहकार्य न केल्याचा आरोप अक्षतच्या नातेवाईकांनी केला आहे. एफआयआर दाखल करण्यात आला आहे, मात्र मुंबई पोलिसांनी अधिक माहिती देत नाहीत, असा दावा केला जात आहे. अक्षतचे पार्थिव अंत्यसंस्कारांसाठी मुंबईहून पाटण्याला पाठवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

सुशांतवर विषप्रयोग झाला नाही, व्हिसेरा रिपोर्ट AIIMSकडून सीबीआयकडे सुपूर्द!

सहा वर्षापूर्वी ‘या’ अभिनेत्याचाही सुशांतप्रमाणे गळफास, तेच कारण, तेच वय, तशीच आत्महत्या!

(Bihar’s Actor Akshat Utkarsh found dead at Mumbai Home family suspect murder)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.