परभणीनंतर आता लातूरमध्ये कोंबड्यांचा मृत्यू! बर्ड फ्लू की अजून काही? गूढ कायम
केंद्रेवाडी येथे अज्ञात आजाराने पोल्ट्री फार्ममधील अनेक कोंबड्या मरण पावल्याची घटना घडली आहे. अचानकपणे कोंबड्या मरण्याचं कारण अजूनतरी समजू शकलेलं नाही. (Latur Chicken found dead)
लातूर : मध्य प्रदेश, हरियाणा सारख्या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा (bird flu) प्रादुर्भाव सुरु असताना जिल्ह्यातील केंद्रेवाडी येथे अज्ञात आजाराने पोल्ट्री फार्ममधील अनेक कोंबड्या मरण पावल्याची घटना घडली. अचानकपणे कोंबड्या मरण्याचं कारण अजूनतरी समजू शकलेलं नाही. परंतु खबरदारी म्हणून येथील जिल्हा प्रशासनाने (Latur District Administration) पोल्ट्री फार्मपासून 10 किमीच्या अंतरापर्यंत निर्बंध जारी केले आहेत. (Chicken found dead in Latur District Administration banned the chicken and egs selling)
सध्या बर्ड फ्लूच्या केसेस मध्यप्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि केरळमध्ये आठळल्या आहेत. महाराष्ट्रात अद्याप कोणत्याही पक्षाला बर्ड फ्लू झाल्याचे आढळलेले नाही. मात्र लातूरमध्ये केंद्रेवाडी येथील पोल्ट्रीफार्ममध्ये अनेक कोंबड्या मरण पावल्या आहेत. त्यामुळे अचानकपणे कोंबड्या मेल्यामुळे येथील कुक्कुटपालन करणारे शेतकरी आणि सामान्य नागरिक धास्तावलेयत. कोंबड्या मरण पावल्याचे समजताच लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोल्ट्री फार्मपासूनच्या 10 किमीच्या परिसरात निर्बंध जारी केले आहेत. तसेच, या भागात कुणालाही जाण्या-येण्यास मनाई करण्यात आली आहे. कोंबड्यांच्या मृत्यूचे निदान जोपर्यंत होणार नाही; तोपर्यंत केंद्रेवाडी भागात लागू केलेले हे निर्बंध लागू असतील.
या पोल्ट्री फार्मपासून 5 किमीच्या अंतरावरील सर्व चिकन आणि अंडी विक्रीसाठीची दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच, घाबरुन न जाता कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण समजेपर्यंत सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केल आहे.
परभणीतही कोंबंड्यांचा मृत्यू
परभणीच्या मुरुंबा गावात शनिवारी (9 जानेवारी) एका दिवसांत तब्बल 900 कोंबड्या अचानक मृत्यूमुखी पडल्या. कोंबड्या अचानक मेल्यामुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून या गावात कोंबड्यांची खरेदी-विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला गेलाय.
पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत
हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, केरळ या राज्यांत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला आहे. माहाराष्ट्रात अजूनतरी या आजाराने पक्षी दगावल्याचे समोर आलेले नाही. असे असले तरी नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीमुळे चिकनचे भाव गडगडले आहेत. देशातील चिकन आणि अंड्याची मागणी जवळपास 60 टक्क्यांनी कमी झाली आहे. मागील आठवड्यात एका पक्षाची म्हणजेच कोंबड्याची किंमत 100 रुपये किलो होती, तिथं आता घट होऊन 60 रुपये प्रति किलो दर झाल्याचे चिकन व्यावसायिक म्हणत आहे.
संबंधित बातम्या :
Bird Flu | पोल्ट्री फार्म मालक आणि दुकानदारांच्या तोंडचं पाणी पळालं!
ठाण्यात आधी 16 पक्षांचा मृत्यू, आता पुन्हा गिधाडं आणि बगळे मृत सापडल्याने धाकधूक वाढली
देशातील 4 राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा कहर, उस्मानाबादेतील पोल्ट्री व्यावसायिक सावध, घेतली जातीय अशी काळजी
(Chicken found dead in Latur District Administration banned the chicken and egs selling)