जातीय हिंसाचाराच्या घटनांवरून भाजपने काँग्रेसवर साधला निशाणा; राहुल गांधी दंगलखोरांचे समर्थन करत आहेत, पोलिसांचे मनोधैर्य तोडत आहेत
नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह 13 पक्षांनी चिंता व्यक्त केला होती. तसेच काँग्रेससह (congress) 13 पक्षांनी संयुक्त निवेदन जारी केले होते. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच आम्ही सर्व पक्ष लोकांना शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन ही केले होते. तर केंद्र सरकारवर निशाणा साधला […]
नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह 13 पक्षांनी चिंता व्यक्त केला होती. तसेच काँग्रेससह (congress) 13 पक्षांनी संयुक्त निवेदन जारी केले होते. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच आम्ही सर्व पक्ष लोकांना शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन ही केले होते. तर केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. यात देशातील समाजाचे ध्रुवीकरण करण्यासाठी सत्ताधारी संस्था अन्न, पेहराव, श्रद्धा, सण, भाषा या मुद्द्यांचा वापर करत आहेत. याचा आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले होते. तसेच केंद्र सरकारकडे जातीय हिंसाचार करणाऱ्यांना शिक्षा करण्याचे संयुक्त आवाहन केले होते. त्यानंतर आता देशातील काँग्रेससह विरोधी पक्षांवर निशाना भाजने साधला आहे. भाजपने (BJP) विरोधी पक्षांवर आरोप केला की काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष मृतदेहांवर “गिधाड राजकारण” करतात आणि त्यांना फक्त समाजातील एकोपा बिघडवायचा आहे. विरोधकांकडून पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे आकाशाकडे चिखलफेक करण्यासारखे आहे, असे म्हटले आहे.
काँग्रेस आणि इतर पक्ष जाळपोळ करतात
देशात नुकत्याच झालेल्या जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह 13 पक्षांनी संयुक्त निवेदन जारी केले होते. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर आता विरोधी पक्षांच्या संयुक्त वक्तव्यावर भाजपने हल्लाबोल केला आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी, विरोधकांकडून पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे आकाशाकडे चिखलफेक करण्यासारखे आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले. यावेळी गौरव भाटिया यांनी राजस्थानमधील करौली हिंसाचारावर प्रश्न उपस्थित करताना, काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना प्रश्न केला. तसेच आरोप केला की त्यांच्या पक्षाच्या दुपट्टीपणाच्या राजकारणामुळे दंगलखोरांवर कारवाई केली जात नाही. राहुल गांधी दंगलखोरांच्या पाठीशी उभे राहून परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच त्यांनी 13 विरोधी पक्षांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनावर तिखट प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले काँग्रेस आणि इतर पक्ष जाळपोळ करतात आणि समुदायांमधील एकोपा बिघडवतात.
13 विरोधी पक्षांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनावर भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी तिखट प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले काँग्रेस आणि इतर पक्ष जाळपोळ करतात आणि समुदायांमधील एकोपा बिघडवतात. मग ते सत्तेत असो किंवा नसो. यावेळी भाजपने प.बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराचे उदाहरण देताना विरोधकांवर ढोंगीपणाचा आरोप ही केला आहे. देशात नुकत्याच झालेल्या जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह 13 पक्षांनी चिंता व्यक्त केला होती. तसेच काँग्रेससह 13 पक्षांनी संयुक्त निवेदन जारी केले होते. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच आम्ही सर्व पक्ष लोकांना शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन ही केले होते.
काँग्रेससह 13 पक्षांनी संयुक्त निवेदन बनावट
13 विरोधी पक्षांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनावर भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी प्रतिक्रीया देताना ते बनावट असल्याचे म्हटले. तर राजस्थानची जनता ही करौली हिंसाचारातील मुख्य आरोपी मतबुल अहमद याला पकडण्यात राजस्थान सरकार अपयशी ठरल्याचे म्हणत आहे. तेथील मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या भूमिकेवर सोनिया गांधी गप्प का? असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. मुख्य आरोपी मतबुल अहमद हा गेल्या 14 दिवसांपासून फरार आहे. तुम्ही देशातील हिंसाचार करणाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी करता मात्र हेच राजस्थानमध्ये का होत नाही. का कारवाई केली जात नाही. कारण तुम्हाला तुष्टीकरणाचे राजकरण हवे आहे.
राहुल गांधी दंगलखोरांचे समर्थन करतात
त्याचबोरबर गौरव भाटिया म्हणाले, तुम्ही जेथे सत्तेत आहात तेथे कारवाई करत नाही. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह मुख्यमंत्री आहेत. त्यांनी हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली आहे. त्यांच्या संपत्यांवर बुल्डोझर चालवला जात आहे. मात्र राहुल गांधी हे या कारवाईला सुडाचे राजकारण म्हणत आहेत. ते दंगलखोरांचे समर्थन करत आहेत. पोलिसांचे मनोधैर्य तोडत आहेत.