VIDEO : तिला जगू द्या… अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाण नुकतंच रिलीज करण्यात आले आहे. (Amruta fadnavis New Song Release)
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाण नुकतंच रिलीज करण्यात आले आहे. ‘तिला जगू द्या…’ असे गाण्याचे बोल आहेत. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हे गाणं गायलं आहे. सध्या सोशल मीडियावर हे गाणं चांगलंच ट्रेंड होत आहे. (Amruta fadnavis New Song Release)
“आज भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे. तिला शिकू द्या, जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या, समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या,” असे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. त्यांनी त्यांचं हे नवं गाणं प्रत्येक स्रिला अर्पण केलं आहे.
आज भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे-
तिला शिकू द्या जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या.#दिवाळी च्या शुभेच्छा देत असताना प्रत्येक भगिनीला समर्पित आहे माझे गीत-तिला जगू द्या? https://t.co/eOY2BE0O8D #bhaidooj2020 #BhaiDuj pic.twitter.com/17cfvdQE9A
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 16, 2020
“कोमल आहे, नाजूक आहे, आहे जरी बावरी…..तिला जगू द्या, जन्म घेऊ द्या, खुशाल आपल्या घरी,” असे या गाण्याचे सुरुवातीचे बोल आहे. गीतकार प्राजक्त पटवर्धन यांनी हे गाणं लिहिलं असून अमृता फडणवीसांनी हे गाणं गायलं आहे. अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याला त्यांच्यासह त्यांची मुलगी द्वीजाचा फोटो पाहायला मिळत आहे.
दरम्यान याआधी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अमृता फडणवीसांनी एक गाणं रिलीज केलं होतं. “अलग मेरा ये रंग है, मेरी खुदसेही जंग है, जीत जाऊ ऐ खुदा, अगर तु मेरे संग है,” असे या गाण्याचे बोल होते. अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हे गाणं गायलं होतं. अॅसिड पीडितांसोबतच त्यांनी या गाण्याचे चित्रीकरण केलं होतं.
अमृता फडणवीस नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांनी संगीत क्षेत्रातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या नेहमी महिला सक्षमीकरण, सबलीकरणाला प्रोत्साहन देत असतात. त्याशिवाय अनेक सामाजिक कार्यक्रमातही त्या सहभागी होत असतात. (Amruta fadnavis New Song Release)
संबंधित बातम्या :