नसीरुद्दीन शाह ‘सरफरोश’मधील ‘गुल्फाम हुसेन’, भाजपचं टीकास्त्र
मुंबई : जमावाकडून होणाऱ्या हिंसाचारावर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर, आता भाजपकडून नसीरुद्दीन शाह यांच्यावर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. नसीरुद्दीन शाह हे ‘सरफरोश’ सिनेमातील ‘गुल्फाम हुसेन’ आहेत, अशी टीका भाजपच्या गोटातून केली जात आहे. राज्यमंत्री दिलीप कांबळेंची टीका “निवडणुक जवळ आल्या की, अशी (नसीरुद्दीन शाह यांनी केलेले विधान) विधान येतात, त्यांच्या […]
मुंबई : जमावाकडून होणाऱ्या हिंसाचारावर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर, आता भाजपकडून नसीरुद्दीन शाह यांच्यावर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. नसीरुद्दीन शाह हे ‘सरफरोश’ सिनेमातील ‘गुल्फाम हुसेन’ आहेत, अशी टीका भाजपच्या गोटातून केली जात आहे.
राज्यमंत्री दिलीप कांबळेंची टीका
“निवडणुक जवळ आल्या की, अशी (नसीरुद्दीन शाह यांनी केलेले विधान) विधान येतात, त्यांच्या व्यक्तव्याचा निषेध करतो. नसीरुद्दीन शाह यांनी जे काम ‘सरफरोश’ सिनेमात केले, जी भूमिका त्यांनी केली, तीच भूमिका संशयास्पद वाटते.”, असे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी म्हटले.
सुनील देवधर यांचीही टीका
“नसीरुद्दीन शाह जी, आम्ही तुम्हाला ‘वेनसडे’मधील सर्वसामान्य माणूस समजत होतो, पण तुम्ही ‘सरफरोश’मधील ‘गुल्फाम हुसेन’ निघालात. पण आपण काँग्रेसच्या जमान्यात बॉम्ब फुटत होते, त्यावेळी तुमची मुले घाबरली नाही, पण आता ज्यावेळी मोदीजी काही पावले उचलतात, त्यावेळी तुमच्या मुलांना भिती वाटली.”, असे भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि त्रिपुराचे भाजपचे प्रभारी सुनील देवधर यांनी म्हटले आहे.
नसीरुद्दीन शाह यांचे स्पष्टीकरण
“मी जे काही म्हटलं होतं, ते काळजीत पडलेला भारतीय म्हणून व्यक्त केलं होतं. मी बोलल्याने मला गद्दार ठरवलं गेलं. ज्या देशावर मी प्रेम करतो, त्या देशाबद्दल मी काळजी व्यक्त करतोय. हा गुन्हा कसा असू शकता?” असे अभिनेते नसीरुद्दीन शाह आज म्हणाले.
Naseeruddin Shah: What I said earlier was as a worried Indian. What did I say this time that I am being termed as a traitor? I am expressing concerns about the country I love, the country that is my home. How is that a crime? pic.twitter.com/XcQOwmzJSh
— ANI (@ANI) December 21, 2018
काय म्हणाले होते नसीरुद्दीन शाह?
जमावाकडून होणाऱ्या हिंसाचारावर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवापेक्षा गायीच्या हत्येला जास्त महत्त्व दिलं जातंय, असं ते म्हणाले. शिवाय आजच्या या समाजाता माझ्या मुलांचीही चिंता वाटते, असं त्यांनी सांगितलं.
समाजात विष पसरलंय. माझ्या मुलाच्या सुरक्षेची चिंता वाटते. कायदा हातात घेण्याची खुली सूट मिळाली आहे. मला धर्माचं शिक्षण मिळालं होतं. पण तिला (पत्नी) धर्माचं शिक्षण मिळालेलं नाही. कारण, ती लिबरल कुटुंबातून आहे. मी माझ्या मुलांना धर्माविषयी शिकवलं नाही. चांगलं आणि वाईट याचा धर्माशी संबंध नाही. पण मुलांची चिंता वाटते, की त्यांना कधी जमावाने घेरलं आणि विचारलं की तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम? तर त्यांच्याकडे काहीही उत्तर नसेल, असं नसीरुद्दीन शाह म्हणाले.
परिस्थिती लवकर सुधारणार नसल्याचं पाहून आणखी चिंता वाटते, असं नसीरुद्दीन शाह म्हणाले. या गोष्टींची भीती वाटत नाही, तर चिड येते. हा राग प्रत्येक चांगला विचार करणाऱ्या व्यक्तीला यायला हवा. हे आपलं घर आहे, इथून कोण आपल्याला हाकलू शकतो?, असा सवालही शाह यांनी केला.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये 3 डिसेंबरमध्ये गोहत्येच्या अफवेवरुन हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात पोलीस अधिकाऱ्याचाही गोळी लागून मृत्यू झाला. या पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूवर बोलताना शाह यांनी त्यांची सद्यपरिस्थितीबाबतची चिंता व्यक्त केली आणि कायदा हातात घेण्याची सूट मिळाली असल्याचं सांगितलं.