Nitesh Rane | उद्धव ठाकरे चपट्या पायांचे… रस्त्यांवरील खड्ड्यांवरून नितेश राणेंचा खोचक टोला
मागील महाविकास आघाडी सरकारने रस्त्यांच्या काँट्रॅक्टर्सना पैसेच दिले नव्हते, असा आरोप नितेश राणे यांनी केला. आता एकनाथ शिंदे सरकार काँट्रॅक्टर किंवा रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न आहेत, त्यामुळे कोकणात जाणाऱ्या भाविकांना तसेच चाकरमान्यांचा त्रास कमी होईल, असे आश्वासन नितेश राणे यांनी दिले आहे.
मुंबईः मागच्या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चपट्या पायांचे… आता ते गेले.. त्यामुळे मुंबई-गोवा मार्गातील रस्त्यांवरील खड्डे आता दूर होणार. गणेश उत्सावातील कोकणवासियांवरचं खड्ड्यांचं विघ्न दूर होणार, असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलंय. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज कोकणापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यांना उत्तर देताना नितेश राणे यांनी जनतेलाही आश्वासन दिले. पुढील दोन दिवसात आम्ही लोकप्रतिनिधी स्वतः लक्ष घालून खड्ड्यांची पाहणी करू, रस्ते खड्डेमुक्त करू, असं अश्वासन दिलं. गणेश उत्सव सहा दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे कोकणात गणेसोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचे खड्डेमय रस्त्यामुळे हाल होणार, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय.
काय म्हणाले नितेश राणे?
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज विधानभवनात भास्कर जाधव यांनी मुंबई-गोवा रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित केला. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले, ‘ भास्कर जाधव कदाचित विसरले असतील की आता उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री नाही. त्यांना जरा आठवण करून देण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आहे. त्यांना जे वाटत होतं, ही भीती त्यांना उद्धव ठाकरे असताना असायची. कारण तो भीती देणारा माणूसच होता. चपट्या पायांचा माणूस गेल्यामुळे सगळ्यांचा असा प्रकार झालाय…
येत्या दोन दिवसात लोकप्रतिनिधींचा दौरा..
मुंबई-गोवा रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या दूर करण्यासाठी पुढील दोन दिवस लोकप्रतिनिधींचा दौरा आयोजित करण्यात आलाय, अशी माहिती नितेश राणे यांनी दिली. ते म्हणाले, ‘ बांधकाम मंत्री रवी चव्हाण यांनी लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. 25 तारखेपर्यंत सगळे खड्डे बुजवावेत असे आदेश दिले होते. जेवढे एजन्सी नेमायचे, ते नेमा, असे आदेश दिले होते. ते स्वतः दौरा करणार होते. आम्हीही तेथेजाणार आहोत. चांगला मंत्री मिळाला आहे. मुंबई गोव्यावर जे विघ्न दरवर्षी जी चर्चा होती, ती कायम बंद होईल, असे मला वाटते….
मविआ सरकारने काँट्रॅक्टर्सचे पैसेच दिले नाहीत…
मागील महाविकास आघाडी सरकारने रस्त्यांच्या काँट्रॅक्टर्सना पैसेच दिले नव्हते, असा आरोप नितेश राणे यांनी केला. आता एकनाथ शिंदे सरकार काँट्रॅक्टर किंवा रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न आहेत, त्यामुळे कोकणात जाणाऱ्या भाविकांना तसेच चाकरमान्यांचा त्रास कमी होईल, असे आश्वासन नितेश राणे यांनी दिले आहे.