आमच्या वॉर्डात का काम करतोस? भाजप खासदाराच्या मुलांकडून भाजप कार्यकर्त्यालाच मारहाण
आमच्या वॉर्डात का काम करतोस? असा सवाल करत भाजप खासदार भागवत कराड यांच्या दोन्ही मुलांनी कार्यकर्त्याला बेदम मारहाण (BJP MP son beat party worker) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
औरंगाबाद : आमच्या वॉर्डात का काम करतोस? असा सवाल करत भाजप खासदार भागवत कराड यांच्या दोन्ही मुलांनी कार्यकर्त्याला बेदम मारहाण (BJP MP son beat party worker) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भागवत कराड यांच्या मुलांनी भाजप युवा मोर्चाचा सदस्य कुणाल मराठे या तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत कुणाल मराठेच्या घरातील महिलांनादेखील धक्काबुक्की करण्यात आली (BJP MP son beat party worker).
या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत काही तरुण कुणाल मराठेला त्याच्या घरात घुसून बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे. ही घटना काल (23 मे) रात्री साडे दहा वाजेच्या सुमरास घडली आहे.
औरंगाबादमधील कोटला कॉलनीच्या समता नगर परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात काल कोरोनाशी संबंधित एक रुग्ण आढळला होता. त्यामुळे या परिसरात कुणाल मराठे या कार्यकर्त्याने सॅनिटायझरची फवारणी केली. याबाबत भागवत कराड यांच्या दोन्ही मुलांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बेदम मारहाण केली, असा दावा कुणाल मराठे या तरुणाने केला आहे.
या वॉर्डात तू का काम करतोस? भाजपकडून फक्त आम्हीच काम करणार, अशी धमकी देण्यात आली. यानंतर घरात घुसून मारहाण करण्यात आली, असं कुणाल मराठेकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, या घटनेतून भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. याशिवाय आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये पक्षांतर्गत राजकारण सुरु असल्याचं दिसत आहे.
हेही वाचा : Deputy CM Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत:च कारचं सारथ्य करतात तेव्हा…