‘रोहित पवारांनी कोंबड्यांची पिल्लं, मासे आणि बियाणं विकून समाजकारण नाही धंदा केला’

'निवडणुकीत पवार घराण्याचा उमेदवार होता. त्यामुळे बारामती पॅटर्नची खूप चर्चा झाली. मात्र, एक वर्षानंतरही मी केलेल्या कामाचं भूमिपूजन मंत्र्यांनच्या हस्ते झाले असतांना ते पुन्हा करत आहेत' अशी टीका यावेळी शिंदे यांनी केली आहे.

'रोहित पवारांनी कोंबड्यांची पिल्लं, मासे आणि बियाणं विकून समाजकारण नाही धंदा केला'
Follow us
| Updated on: Oct 24, 2020 | 6:50 AM

मुंबई : आमदार रोहित पवारांनी एक वर्षात फक्त कोंबड्यांची पिल्लं, मासे आणि बी बियाणे इकडे आणून विकली. त्यामुळे ते समाजकारण करण्यासाठी नाही तर धंदा करण्यासाठी आले आहेत अशी गंभीर टीका भाजप उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अहमदनगरला कर्जत इथे ते पत्रकारांशी बोलत होते. (BJP vice president Ram Shinde serious allegations against Rohit Pawar)

‘निवडणुकीत पवार घराण्याचा उमेदवार होता. त्यामुळे बारामती पॅटर्नची खूप चर्चा झाली. मात्र, एक वर्षानंतरही मी केलेल्या कामाचं भूमिपूजन मंत्र्यांनच्या हस्ते झाले असतांना ते पुन्हा करत आहेत’ अशी टीका यावेळी शिंदे यांनी केली आहे. इतकंच नाही तर तुकाई उपसा सिंचन योजनेसह अनेक कामं बंद पाडली. एक वर्षात त्यांनी एकही काम आणलं नाही. त्यामुळे बारामती पॅटर्न सपशेल अपयशी ठरला असुन लोकांची घोर निराशा झाली आहे असा आरोप शिंदे यांनी केला आहे.

APMC च्या फळ मार्केटमध्ये स्पेनचा हापूस, 10 आंब्यांची किंमत 4,500 रुपये

त्याचबरोबर हे नवीन पर्व वगैरे काही नाही. सगळं खोटं आहे असल्याचा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. यंदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. मात्र, आमदार कोणाच्या बांधावर नाही गेले. तर पंचनामे व्यवस्थित होत नाही अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. त्यांना फक्त राजकारण करायचं आणि लोकांना भूल भुलया करायचा आहे असा आरोप शिंदे यांनी केला.

दरम्यान, राम शिंदे यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरही टीका केली. एकनाथ खडसे सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार असल्याने त्यांना राष्ट्रवादीने फोडलं, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केला आहे.

40 वर्षात बाईला समोर ठेवून कधीच राजकारण केलं नाही : एकनाथ खडसे

70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीची (सक्तवसुली संचालनालय) चौकशी सुरु आहे. याप्रकरणी खडसे विरोधी पक्षनेते असताना ते प्रमुख साक्षीदार होते. त्यामुळे त्यातील साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे, असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.

(BJP vice president Ram Shinde serious allegations against Rohit Pawar)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.