Bihar Election: ‘असदुद्दीन ओवेसींचा वापर करुन घेण्याची भाजपची रणनीती यशस्वी ठरली’

असदुद्दीन ओवेसी यांनी यंदा बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 100 सभा घेतल्या होत्या. | Asaduddin Owaisi

Bihar Election: 'असदुद्दीन ओवेसींचा वापर करुन घेण्याची भाजपची रणनीती यशस्वी ठरली'
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 5:47 PM

नवी दिल्ली: बिहार विधानसभेच्या निवडणुकीत (Bihar election results 2020) असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचा वापर करून घेण्याची भाजपची रणनीती बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरली, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी यांनी केले. भाजपच्या या रणनीतीपासून भविष्यात सेक्युलर पक्षांनी सावध राहिले पाहिजे. ओवेसी यांच्या पक्षामुळे महागठबंधनची मते कापली गेली, असा दावा अधिर रंजन चौधरी यांनी केला. (bjp get success in vote cutting by using Asaduddin Owaisi MIM party says Adhir Ranjan Chowdhury)

असदुद्दीन ओवेसी यांनी यंदा बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 100 सभा घेतल्या होत्या. त्यामुळे सीमांचल भागातील राजकीय समीकरणे बदलली होती. बिहारमधील एकूण 20 उमेदवारांपैकी सीमांचल प्रांतात एमआयएमने आपले 14 उमेदवार उभे केले होते. यापैकी तीन जागांवर एमआयएम आघाडीवर आहे. तर दोन जागांवर एमआयएम दुसऱ्या स्थानावर आहे.

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजला झटका देण्यासाठी 20 जागांवर आपले उमेदवार उभे केले. मात्र, ओवेसी यांच्या या रणनितीने भाजप्रणित एनडीएला सर्वाधिक फायदा झाल्याचे समोर येत आहे. तर महागठबंधनला खूप मोठा फटका बसताना दिसत आहे. सीमांचल प्रांतात विधानसभेच्या एकूण 24 मतदारसंघापैकी 11 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर महागठबंधन फक्त पाच जागांवर आघाडीवर दिसत आहे. उर्वरित आठ जागांवर इतर आघाडीवर असल्याचं समजत आहे. यामध्ये एमआयएम तीन जागांवर आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

ओवेसी यांचा पक्ष अमौर आणि कौचाधामन मतदारसंघात आघाडीवर दिसत आहे. काही मतदारसंघांमध्ये एमआयएम भलेही पिछाडीवर असले तरी या पक्षामुळे महागठबंधनला मोठा फटका बसला आहे. परिणामी, त्याचा फायदा भाजपला जास्त झाल्याचं दिसत आहे.

संबंधित बातम्या:

ओवेसी फॅक्टरने समीकरणच बदलले, 11 जागांवर NDA ची घोडदौड

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये 23 पैकी 21 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं!

मुख्यमंत्रिपदाच्या आशेने लंडनहून बिहारला, पुष्पम प्रिया दोन्ही मतदारसंघांत पिछाडीवर

(bjp get success in vote cutting by using Asaduddin Owaisi MIM party says Adhir Ranjan Chowdhury)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.