AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी मिशन धारावी, आता ध्येय पुणे, पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी इक्बाल सिंह चहल यांची मदत

मुंबईतील कोरोना रोखण्यासाठी आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी ज्या उपाययोजना केल्या, तोच पॅटर्न पुण्यात राबवण्यात येणार आहेत.

आधी मिशन धारावी, आता ध्येय पुणे, पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी इक्बाल सिंह चहल यांची मदत
Follow us
| Updated on: Jul 18, 2020 | 2:28 PM

पुणे : पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांची मदत घेतली जाणार आहे. मुंबईतील कोरोना रोखण्यासाठी आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी ज्या उपाययोजना केल्या, तोच पॅटर्न पुण्यात राबवण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली. (BMC commissioner Iqbal Singh Chahal to help Pune in corona war)

या बैठकीत पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पाचारण करण्याबाबत चर्चा झाली. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सौरभ राव, एस. चोक्कलिंगम, विक्रम कुमार, श्रावण हर्डीकर या पुण्यातल्या अधिकाऱ्यांसह बैठक झाली.

धारावी कोळून प्यायलेला अधिकारी मुंबई महापालिका आयुक्तपदी, कोण आहेत इक्बाल चहल?

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मुंबईच्या धर्तीवर तातडीच्या रुग्णालयांची उभारणी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

मुंबईतील कोरोनावर नियंत्रण

मुंबईतील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. वरळी, धारावी यासारख्या भागात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. धारावीमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक करण्यात आलं आहे. याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिका क्षेत्रात पुन्हा पूर्ण लॉकडाऊनची गरज नाही. मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे,” अशी माहिती चार दिवसापूर्वी दिली होती. तसेच “मुंबईत रुग्णसंख्या दुपटीचा दर हा 50 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. तर डिस्चार्ज रेटही 70 टक्के आहे,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

WHO कडून धारावीची दखल 

“धारावी एक उदाहरण आहे की ज्यामध्ये कोरोनाने शिरकाव केला आणि सरकारने त्यावर नियंत्रण मिळविले”, असा कौतुकाचा वर्षाव वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख टेड्रोस अडॅनॉम गेब्रेयसिस यांनी केला आहे.

मुंबईतील धारावी झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरला होता. त्यामुळे दिवसाला मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत होते. पण मुंबई महापालिकेने येथील कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवले आहे.

(BMC commissioner Iqbal Singh Chahal to help Pune in corona war)

संबंधित बातम्या 

Mission Zero | कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुंबई महापालिकेचा नवा अ‍ॅक्शन प्लॅन, मिशन झिरो मोहिम नेमकी काय?  

Special Report | कोरोना नियंत्रणाचा नवा ‘धारावी पॅटर्न’

 धारावी कोळून प्यायलेला अधिकारी मुंबई महापालिका आयुक्तपदी, कोण आहेत इक्बाल चहल?  

 वादळ थोपवणारा माणूस! तीन दिवस तयारी, ओदिशाची मदत, BMC आयुक्तांचं भन्नाट प्लॅनिंग ! 

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक.
पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं...
पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं....
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम.
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?.
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात.
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले.