अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल, माध्यमिक शिक्षण संचालक मंडळाच्या सूचना

राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक मंडळाकडून इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे (Changes in Eleventh Admission Process).

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल, माध्यमिक शिक्षण संचालक मंडळाच्या सूचना
Follow us
| Updated on: Jul 26, 2020 | 12:22 PM

पुणे : राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक मंडळाकडून इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे (Eleventh Admission online process). विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी आजपासून (26 जुलै) ऑनलाईन नोंदणी करु शकतील. विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करुन लॉगीन आयडी आणि पासवर्डही काढता येईल. त्याचबरोबर प्रवेश अर्जातील पहिला भाग एक ऑगस्ट पासून भरता येईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे (Eleventh Admission online process).

अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि केंद्रीय प्रवेश समितीकडून राबवले जाते. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जातील पहिला भाग भरण्यास उपलब्ध करुन दिला जाईल, असं शिक्षण संचालक मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. दहावीचा निकाल 31 जुलैपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

यापूर्वी अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 15 जुलै रोजी सुरु होणार होती. पण पुणे, पिपंरी-चिंचवडसह अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्याने 26 जुलै रोजी म्हणजेच आज ऑनलाईन अर्जाचा पहिला भाग भरता येईल, असं माध्यमिक शिक्षण संचालक मंडळाने सांगितलं होतं.

मात्र, दहावीचा निकाल अद्याप जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशाचा पहिला भाग 1 ऑगस्ट रोजी भरता येईल, असं  माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय आजपासून विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करु शकतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, दहावीचा निकाल कधी लागेल, याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी माहिती दिली होती. “कोरोना संकटामुळे दहावीच्या भूगोलाची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली. दरम्यान, या काळात कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रांवर आणि पोस्ट ऑफिसमध्ये अडकल्या होत्या. खरंतर एसएससी बोर्डाचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी चांगली कामगिरी केली. बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. आता दहावीचादेखील निकाल जाहीर होईल. या महिन्याअखेरीस दहावीचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न आहे”, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं.

हेही वाचा : भारताने मैत्रीचा हात पुढे केला, पण पाकिस्तानने पाठीत खंजीर खुपसला : पंतप्रधान मोदी 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.