इंद्रावती नदीत प्रवाशांनी भरलेली नाव बुडाली; 13 जणांना वाचवले, चारजण बेपत्ता

गडचिरोलीमध्ये इंद्रावती नदीत ही नाव बुडाली आहे. यातून 13 जणांना सुरक्षित बाहेर काढलं असून आणखी काही जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इंद्रावती नदीत प्रवाशांनी भरलेली नाव बुडाली; 13 जणांना वाचवले, चारजण बेपत्ता
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 8:42 AM

गडचिरोली : एकीकडे राज्यात नंदूरबारमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे तर दुसरीकडे नदीत प्रवाशांची नाव बुडाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. गडचिरोलीमध्ये इंद्रावती नदीत ही नाव बुडाली आहे. यातून 13 जणांना सुरक्षित बाहेर काढलं असून आणखी काही जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि मदतकार्य घटनास्थळी दाखल झालं आहे. (boat full of passengers sank in Indravati river 13 rescued four missing)

मिळालेल्या माहितीनुसार, सिरोंचा तालुक्यात सोमनपल्ली इथून छत्तीसगडच्या एका कार्यक्रमासाठी काही लोक दोन लहान नावेनं गेले होतेय तिथून परतत असताना एका नाव अचानक नदीत बुडाली. संध्याकाळी सात वाजताची ही घटना आहे. संध्याकाळी हा अपघात घडल्यानंतर तब्बल 13 जण नदीतून सुखरूप बाहेर आले तर आणखी दोन ते तीन नागरीक बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नंदुरबारमध्ये बस ४० फूट खोल दरीत कोसळली; चौघांचा मृत्यू, 35 प्रवासी गंभीर जखमी

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभाराचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. शोधासाठी वन विभाग आणि पोलीसांची शोध मोहीम सुरू आहे. तर नेमक्या कोणत्या कारणाने नाव नदीत बुडाली याचा पोलीस शोध घेत आहे.

दरम्यान, आज बुधवारी आणखी एक भीषण अपघात नंदूरबारमध्ये घडला आहे. प्रवाशांनी भरलेली बसही तब्बल 35-40 फूट खोल दरीत कोसळली आहे. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून 35 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Good News: लवकरच येणार कोरोना वॅक्सिन, डिसेंबरपर्यंत मॉडर्ना लसीला मिळणार मंजुरी

(boat full of passengers sank in Indravati river 13 rescued four missing)

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.