Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहारमध्ये गंगा नदीत मोठी दुर्घटना, 100 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, अनेक जण बेपत्ता

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया भागात गंगा नदीत 100 प्रवाशांनी भरलेली बोट पलटी झाली (Boat sinking in Ganga river in Bihar).

बिहारमध्ये गंगा नदीत मोठी दुर्घटना, 100 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, अनेक जण बेपत्ता
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 4:14 PM

पाटणा : बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया भागात गंगा नदीत 100 प्रवाशांनी भरलेली बोट पलटी झाली. या बोटमध्ये लहान मुलं आणि महिलादेखील होत्या. या बोटीत काही दुचाकी आणि सायकलदेखील ठेवण्यात आल्या होत्या. बोट उलटल्यानंतर काही प्रवाशी पोहत किनाऱ्यावर पोहोचले. मात्र, बरेच जण अजूनही बेपत्ता आहेत (Boat sinking in Ganga river in Bihar).

या दुर्घटनेनंतर किनाऱ्यावरील नागरिकांनी तातडीने बचाव कार्याला सुरुवात केली. त्यानंतर प्रशासनदेखील घटनास्थळ दाखल झाले. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे. मात्र, अद्यापही अनेक जण बेपत्ता आहे. बचाव कार्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

बोटीत प्रवास करणारे सर्वाधिक प्रवासी हे मजूर आहेत. बोट उलटल्यानंतर जे मजूर पोहत किनाऱ्यावर पोहोचले त्यांचापैकी काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे (Boat sinking in Ganga river in Bihar).

बोटीतून उडी मारुन जे पोहत सुरक्षितपणे किनाऱ्यावर दाखल झाले, त्यांनी या दुर्घटनेची सविस्तर माहिती दिली. गंगा नदीच्या किनाऱ्यावरील  गोपालपूर परिसरातील गावकरी आपल्या शेतात मक्काची पेरणी करण्यासाठी जात होते. गंगा नदिच्या पलिकडे त्यांची शेती आहे. त्यामुळे गावातील जवळपास 100 ते 125 नागरिक एकत्र बोटीत बसले. ही बोट नदीत अर्ध्या वाटेवर आली तेव्हा अचानक वादळात फसली. किनाऱ्यावर उभे असलेले नागरिक बोटीची वाट पाहत होते. त्यांना दुर्घटना घडण्याची चाहूल लागताच त्यांनी तातडीन बचाव कार्याला सुरुवात केली.

हेही वाचा : भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी आग! 150 दिवसांपासून आग भडकलेलीच, 3 हजार लोक स्थलांतरीत

राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत.
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं.
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.