AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल, गुदमरुन मृत्यू झाल्याचा निष्कर्ष

सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल हा पाच डॉक्टरांकडून तयार केला गेला (Sushant Singh Rajput Final Post Mortem Report) आहे.

Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल, गुदमरुन मृत्यू झाल्याचा निष्कर्ष
Follow us
| Updated on: Jun 24, 2020 | 6:50 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येतनंतर 10 दिवस उलटले आहेत. सुशांतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल पोलिसांच्या हाती आला आहे. या अहवालात सुशांतचा गुदमरुन मृत्यू झाल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे. (Sushant Singh Rajput Final Post Mortem Report)

सुशांत सिंहच्या अंतिम शवविच्छेदन अहवालानुसार, “सुशांतचा गुदमरुन मृत्यू झाल्याचा निष्कर्ष लावण्यात आला आहे. गळा दबला गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्याचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल हा तीन डॉक्टरांकडून तयार करण्यात आला होता. तर आता अंतिम शवविच्छेदन अहवाल हा पाच डॉक्टरांकडून तयार केला गेला आहे.”

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस कसोशीने तपास करत आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी वेगवेगळ्या चार तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. सुशांतच्या चार्टर्ड अकाऊंटची आज पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत 16 जणांचे जबाब घेतले आहेत. सी.ए हे 17 वे साक्षीदार आहेत. सीएच्या माध्यमातून सुशांतच्या आर्थिक व्यवहाराचा तपास सुरू झाला आहे.

रिया चक्रवर्तीची नऊ तास चौकशी 

सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची गुरुवारी (18 जून) जवळपास नऊ तास चौकशी करण्यात आली होती. सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झालेल्या रियाचा जबाब रात्री जवळपास आठ वाजता संपला.

सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी आत्महत्या

सुशांत सिंग राजपूत याने रविवारी (14 जून 2020) मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुरुवातीला वांद्रे पोलीस तपास करत आहेत. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे. (Sushant Singh Rajput Final Post Mortem Report)

संबंधित बातम्या : 

Chirag Paswan | सुशांत सिंह आत्महत्येवरुन बिहारमध्ये संताप, चिराग पासवान यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन

Sushant Singh Rajput Investigation | सुशांतच्या जुन्या मैत्रिणीचाही जबाब, रोहिणी अय्यरची पोलीस चौकशी

भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?
भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?.
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक.
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल.
बारावीचा रिझल्ट लागला, राज्याचा निकाल किती टक्के? यंदा बाजी कोणाची?
बारावीचा रिझल्ट लागला, राज्याचा निकाल किती टक्के? यंदा बाजी कोणाची?.
भारताची पाऊलं अफगाणिस्ताननं ओळखली? माजी राष्ट्रपती म्हणाले, असं वाटतंय
भारताची पाऊलं अफगाणिस्ताननं ओळखली? माजी राष्ट्रपती म्हणाले, असं वाटतंय.
फडणवीस शिंदेंपासून सावध रहा, कारण... संजय राऊतांनी काय दिला सल्ला?
फडणवीस शिंदेंपासून सावध रहा, कारण... संजय राऊतांनी काय दिला सल्ला?.
पाकचा लष्कर प्रमुख भेदरला, कारवाईच्या भितीची धास्ती अन् लपून बसला...
पाकचा लष्कर प्रमुख भेदरला, कारवाईच्या भितीची धास्ती अन् लपून बसला....
पहलगाम हल्ल्यानंतरचा CCTV समोर, जीव मुठीत घेऊन पर्यटकांची धावाधाव अन्
पहलगाम हल्ल्यानंतरचा CCTV समोर, जीव मुठीत घेऊन पर्यटकांची धावाधाव अन्.
भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्...
भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्....
9 तारखेच्या आतच काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?
9 तारखेच्या आतच काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?.