एक कोटी द्या नाही तर बॉम्बने उडवून देऊ; भाजप नेते गिरीश महाजन यांना धमकी

'एक कोटी रुपये द्या, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ,' अशी धमकी भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आली आहे.

एक कोटी द्या नाही तर बॉम्बने उडवून देऊ; भाजप नेते गिरीश महाजन यांना धमकी
गिरीश महाजन, भाजप नेते.
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 12:46 PM

जळगाव: ‘एक कोटी रुपये द्या, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ,’ अशी धमकी भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. (Bomb threat calls to Girish Mahajan)

जामनेरमध्ये जी. एम. फाऊंडेशच्या ग्लोबल हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी गिरीश महाजन यांचे स्वीय सहायक दीपक तायडे यांना आलेल्या निनावी फोनवरून ही धमकी देण्यात आली. गिरीश महाजन यांना एक कोटी रुपये द्यायला सांग. नाही तर त्यांना बॉम्बने उडवून देऊन, असं धमकावणाऱ्याने तायडेंना सांगितलं. खंडणीसाठी धमकावणाऱ्याने केवळ फोनच केला नाही तर त्याच फोनवर धमकावणारा मेसेजही पाठवला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत एक कोटी रुपये द्या नाही तर बॉम्ब ब्लास्ट करू, अशी धमकी यावेळी देण्यात आली होती, अशी माहिती तायडे यांनी दिली. धमकी देणारा हिंदीत बोलत होता, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. याप्रकरणी महाजन यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. तसेच त्यांनी कुणावरही संशय व्यक्त केला नाही. घटनेनंतर घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक संशयितांची कसून चौकशी केली जात होती. (Bomb threat calls to Girish Mahajan)

संबंधित बातम्या :

गिरीश महाजनांच्या घरी गुप्त बैठक सुरु, वैयक्तिक कारणांमुळे बैठकीला दांडी – एकनाथ खडसे

भाजपचे ‘संकटमोचक’ अपघातग्रस्ताच्या मदतीला, गिरीश महाजनांमुळे बाईकस्वारावर वेळीच उपचार

वादळाचा कोकणाला मोठा फटका, 100 कोटींच्या मदतीने काही होणार नाही : गिरीश महाजन

(Bomb threat calls to Girish Mahajan)

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.