संभाजी उद्यानात गडकरींचा पुतळा बसवा, ब्राह्मण महासंघ आक्रमक
पुणे : नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्यावरुन पुन्हा वादंग माजण्याची शक्यता आहे. कारण संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांचा पुतळा उभारण्याची मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे. 3 जानेवारी 2017 च्या मध्यरात्री संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा तोडण्यात आला होता. ‘राजसंन्यासी’ नाटकातून राम गणेश गडकरी यांना छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप आहे. तोडलेल्या स्मारकाची पूजा पुण्यात संभाजी […]
पुणे : नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्यावरुन पुन्हा वादंग माजण्याची शक्यता आहे. कारण संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांचा पुतळा उभारण्याची मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे. 3 जानेवारी 2017 च्या मध्यरात्री संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा तोडण्यात आला होता. ‘राजसंन्यासी’ नाटकातून राम गणेश गडकरी यांना छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप आहे.
तोडलेल्या स्मारकाची पूजा
पुण्यात संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांच्या तोडलेल्या पुतळ्यावरुन ब्राह्मण महासंघ पुन्हा अक्रमक झालं आहे. पुणे महानगरपालिकेच्या आश्वासनची आठवण करुन देण्यासाठी तोडलेल्या स्मारकाची निषेधात्मक पूजा करण्यात आली. पुतळ्याच्या वादग्रस्त जागेत प्रशासनानं मनाई केल्यानं संरक्षक कुंपणाला पुष्पहार अर्पण करुन पूजा केली. गडकरी यांच्या पुण्यतिथी निमित्तानं ब्राह्मण महासंघानं पूजा करुन मनपा प्रशासनाचा निषेध केला.
ब्राह्मण महासंघाचे आरोप का?
एका महिन्यात पुतळ्याचा निर्णय न झाल्यास महापौर आणि महापालिका आयुक्तांच्या दालनात गडकरींचा पुतळा बसवण्याचा इशारा ब्राह्मण महासंघानं दिला आहे. यावेळी ब्राह्मण महासंघानं मुख्यमंत्री आणि महानगरपालिका प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवण्यासाठी महासंघ पाठपुरावा करतंय. मुख्यमंत्र्यांनी अश्वासन दिलं होतं. मात्र तीन वर्षांत एक दगड रचला नसल्यानं स्मारक होऊ द्यायचं नसल्याचा आरोप ब्राह्मण महासंघानं केला आहे.
पुतळ्यासाठी मनपा प्रशासनानं कुठंही जागा दिली तर ब्राह्मण महासंघ स्वखर्चाने पुतळा बसवेल, असंही ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी म्हटलंय.