LIVE : नागपूर महापालिकेत भ्रष्टाचार, इथे संडास सुद्धा कागदावरून गायब होतात : अजित पवार

| Updated on: Feb 07, 2021 | 11:08 PM

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स...

LIVE : नागपूर महापालिकेत भ्रष्टाचार, इथे संडास सुद्धा कागदावरून गायब होतात : अजित पवार

महाराष्ट्र आणि देशाभरातील घडामोडी लाईव्ह:

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Feb 2021 09:17 PM (IST)

    पुणे : निघोजच्या दोन सदस्यांचे खेडमधून अपहरण

    पुणे : निघोज ग्रामपंचायतच्या दोन नवनिर्वाचीत सदस्यांचे खेडमधून अपहरण करण्यात आले. हे सदस्स सहलीसाठी बाहेरगावी गेले होते. खेड परिसरात लघुशंकेसाठी थांबले असता आठ दहा जनांच्या टोळक्याने शस्त्रांचा धाक दाखवून दोघांना गाडीत घालून पळवून नेले आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांनी येथे सरपंच पदाची निवडणूक होत आहे.

  • 07 Feb 2021 08:09 PM (IST)

    उत्तराखंड दुर्घटनेतील बचाव कार्यासाठी हवाई दलाकडून दोन हेलिकॉप्टर रवाना

    उत्तराखंडच्या जोशीमठाच्या रेणी भागातील ऋषिगंगा प्रोजेक्टवर हिमकडा कोसळला आहे. या दुर्घटनेतील बचाव कार्यासाठी हवाई दलाकडून दोन हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहेत.

  • 07 Feb 2021 06:46 PM (IST)

    नागपुरातील जेष्ठ अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

    नागपुरमधील ज्येष्ठ अपक्ष नगरसेविका अभा बिज्जू पांडे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचा आज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल पटेल उपस्थित आहेत. तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित आहेत.

    अजित पवार यांच्या भाषणातील मुद्दे :

    नागपुरात या कार्यक्रमाला एकत्र यायचं ठरवलं. मात्र अनिल देशमुख यांना कोरोना झाला.

    आज राष्ट्रवादीसाठी आनंदाचा दिवस आहे. मात्र उत्तराखंडमध्ये झालेली दुर्घटना ही देशाला दुःखात घेऊन गेली. त्या ठिकाणी हाय अलर्ट जाहीर केलाय. आम्ही सगळ्या पीडितांच्या दुःखात सहभागी आहोत.

    आभा पांडे आज पक्षात प्रवेश करत आहे त्याचा मोठा आनंद आहे.  आतापर्यंत अपक्ष असताना सुद्दा त्यांच्या मागे मोठा जनसमुदाय आहे ते या सभेवरून दिसून येते.

    गुंड प्रवृत्तीच्या लोकांना भाजपच्या काळात महामंडळ दिली, नागपुरात गुंडगिरी वाढली होती

    भाजपच्या या महापालिकेत भ्रष्टाचार होत आहे. इथे संडास सुद्धा कागदावरून गायब होतात

    कोरोना काळात आमचे पोलीस, आरोग्य कर्मचारी यांनी मोठी काम केली. आम्ही त्यांच्या पाठीशी होतो

    कोरोनाला घाबरून जाण्याचा कारण नाही आता लस सुद्धा आली

    उपराजधानीच शहर आहे, हे स्वच्छ शहर असलं पाहिजे

    केंद्रापासून राज्यात सुद्धा भाजपच्या काळात मोठी मंत्रालय होते. त्यांनी शहरासाठी काय केलं?

    फडणवीस यांना ज्या महापालिकेने कमी वयाचा महापौर म्हणून सन्मान दिला, त्यांनी या राज्यात असताना या महापालिकेचे प्रश्न सोडवले का ?

    महापालिकेतील भ्रष्टाचार झालेला असेल तर पुरावे मला द्या मी चौकशी लावतो. जे मला करता येत नाही तो शब्द मी देत नाही

    प्रफुल पटेल यांच्या भाषणातील मुद्दे :

    आम्हाला माहीत आहे नागपूर मध्ये आम्हाला जेवढं लक्ष घालायला पाहिजे ते घालू शकलो नाही. मात्र आता नागपुरात राष्ट्रवादी एक नंबरवर असेल

    देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री होते, गडकरी केंद्रीय मंत्री आहेl. मात्र नागपूरच्या मिहानमध्ये काहीच काम झालं नाही

    जमीन उघड्या पडल्या आहे, नोकरीसाठी तरुण मुंबई-पुणे कडे जात आहे

    आपण आता यात लक्ष घालून मिहानमध्ये मोठं काम करू आणि रोजगार देऊ

    राष्ट्रवादी विदर्भात काही प्रमाणात कमी आहे. दूर करण्यासाठी आता आम्ही पूर्ण लक्ष घालणार, पक्ष मोठा करणार

  • 07 Feb 2021 04:53 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन, पण कोरोनाचा फटका बसला : अजित पवार

    नागपूर : “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं. मात्र कोरोनाचा मोठा फटका बसला. नागपूरला कराराप्रमाणे होणारं अधिवेशन या वर्षी नागपुरात घेता आलं नाही.  बजेट अधिवेशन आम्ही डिजीटल करण्याचा प्रयत्न करू”, असं अजित पवार म्हणाले.

    अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे:  

    अनिल देशमुख यांना कोरोनाने गाठलं. त्यामुळे सगळ्यांनी कोरोनाच्या बाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे.

    अजित पवार यांनी नागपूरला येणं टाळलं अश्या बातम्या येतात. मात्र मी प्रत्येक बाबीचा पाठपुरावा करत असतो.

    यावर्षी धरणांची परिस्थिती चांगली आहे पाऊस चांगला आहे.

    वन नेशन वन टॅक्सनुसार केंद्रा कडून येणारा पैसा अजून आला नाही. त्यामुळे आपल्या तिजोरीतून खर्च करावा लागतो

    मध्ये बातम्या पण मला अशा वाचायला मिळाल्या. खरंतर यात माझीही चूक आहे. मी माझी चूक नाही असं म्हणणार नाही. माझ्याकडून काही कळण्याआधीच अजित पवार यांनी नागपूरला येणं टाळलं. वास्तविक मी प्रत्येक विभागाच्या डीपीसीच्या बैठका घेतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील घेतल्या. सर्वच विभागांमध्ये जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. मागे जयंत पाटील देखील अर्थमंत्री असताना त्यांनी त्यांच्या परीने काम केलं. मी पण माझ्या परीने काम करतो. आजही मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मिहानबद्दल अलिकडे बैठक झाली नाही असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यासाठी पाठपुरावा आवश्यक आहे.

    आपल्याकडे मुक्त प्राणीसंग्रहालय असावं अशी इच्छा होती. तेही झालं. पण, आजच्या घडीला देखील केंद्र सरकारने जे वन नेशन वन टॅक्स ठरवलं होतं, संसदेत शब्द दिला. पण 25 हजार कोटी रुपये दिलेले नाहीत. त्याचा परिणाम राज्यातील विकासावर होतोय. आम्हाला पगार तर द्यावाच लागतो.

  • 07 Feb 2021 02:38 PM (IST)

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मेडिकल कॉलेजच्या ठिकाणी आगमन

    सिंधुदुर्ग- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मेडिकल कॉलेजच्या ठिकाणी आगमन

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्राण्यांच्या मेडिकल कॉलेज चे उद्घाटन

    अमित शहा यांच्या सोबत भाजपचे अनेक दिग्गज

    नारायण राणे यांचा मेडिकल कॉलेज हा ड्रीम प्रोजेक्ट

  • 07 Feb 2021 12:24 PM (IST)

    बर्ड फ्लूमुळे माणसाचा मृत्यू होत नाही मात्र शेतकऱ्यांचं आणि पोल्ट्रीचं मोठं नुकसान होतं – सुनील केदार

    – धुळ्यात बर्ड फ्लू संदर्भात पॉझिटिव्ह रिपोर्ट आला हे खरं आहे

    – नष्ट करण्यासाठी सुरवात केली

    – फैलाव होऊ नये म्हणून जास्तीचे नमुने घेतले

    – बर्ड फ्लू मुळे माणसाचा मृत्यू होत नाही मात्र शेतकऱ्यांचं आणि पोल्ट्री च मोठं नुकसान होत

    – पोल्ट्री वर ग्रामीण भागाची अर्थ व्यवस्था अवलंबून असते

    – आज आमच्या टीम तिकडे आहे उध्या पर्यन्त आणखी काही निर्णय घेऊ

    – बर्ड फ्लू चा फैलाव होऊ नये यासाठी उपाय योजना सुरू आहे ,घाबरण्याचे कारण नाही

  • 07 Feb 2021 11:59 AM (IST)

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं स्टेजवर आगमन

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं स्टेजवर आगमन – दिप प्रज्वलन करून कार्यकर्माला सुरवात… – छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांचा जय घोष… – मुंबईतील काही उद्योजकांसह , CA, वकील,टॅक्स सल्लागारसारख्या प्रोफेशनल क्षेत्रातील व्यक्तींशी बजेटबाबत करणार चर्चा – बजेटबाबत उद्योजकांचं काय म्हणणं आहे याचबरोबर त्यांच्या प्रश्नांवरही चर्चा केली जाणार आहे….

  • 07 Feb 2021 11:32 AM (IST)

    पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन? मंगळवारी होणार निर्णय

    पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन मंगळवारी होणार निर्णय, मंगळवारी विद्यापीठ परीक्षा मंडळाची होणार बैठक, ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी लागते 70 दिवस आधी तयारी, प्रथम सत्राच्या पुणे नगर आणि नाशिक या जिल्ह्यातील तब्बल 7 लाख विद्यार्थ्यांची विद्यापीठाला घ्यावी लागणार परीक्षा, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद ऑफलाईन परीक्षा घेण्यास मान्यता देणार का याकडे सगळ्यांच लक्ष, मंगळवारी विद्यापीठ परीक्षेच्या संदर्भात करणार अंतिम निर्णय जाहीर…..

  • 07 Feb 2021 11:31 AM (IST)

    पुणे ग्रामीण व शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राज्य शासनाकडून बदल, अजित पवारांचा बैठकीत निर्णय

    पुणे ग्रामीण व शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राज्य शासनाकडून बदल,

    जिल्ह्यातील ग्रामीण हद्दीचा शहर आयुक्तालयात समावेश, तर शहरातील काही पोलीस ठाण्यांचा ग्रामीण आयुक्तालयात समावेश,

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत घेतला निर्णय,

    शहराजवळचं लोणी काळभोर येणार पुणे शहर पोलीस हद्दीत तर वाघोलीचाही ग्रामीणमधून केला शहर हद्दीत समावेश,

    विविध पोलीस ठाण्यांच्या रचनेत केला बदल

    वाढती लोकसंख्या आणि कामकाजाचं प्रमाण पाहता हद्दीच्या रचनेत केला बदल,

    4 जानेवारीला अजित पवारांच्या बैठकीत घेतला निर्णय,

    राज्य शासनाने दिल्या पोलीस अधिक्षक आणि पोलीस आयुक्तांना सूचना

  • 07 Feb 2021 11:30 AM (IST)

    कृषी बिलाविरोधात शेतकऱ्यांना ग्रामसभा घेण्यासाठी ग्रामसभेवरील बंदी त्वरित उठवा – राजू शेट्टी

    कृषी बिलाविरोधात शेतकऱ्यांना ग्रामसभा घेण्यासाठी ग्रामसभेवरील बंदी त्वरित उठवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी, शिष्टमंडळासह मुश्रीफ यांची भेट घेत केली मागणी, मंगळवारी ग्रामसभां वरील बंदी आदेश उठवण्याचे मंत्री मुश्रीफ यांचे आश्वासन, सोशल डिस्टन्स पाळून ग्रामसभा घ्यायला महाराष्ट्रात परवानगी देण्याची ही दिली ग्वाही

  • 07 Feb 2021 11:22 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांविषयी अक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या शिरीष कटेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

    पंढरपूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी अक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष शिरीष कटेकर यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, भादवि कलप 504,505 कलमान्वये केला गुन्हा दाखल, या प्रकरणी शहर शिवसेना प्रमुख रवी मुळे यांनी केली फिर्याद दाखल, कालच्या घटनेने भाजपाचे माजी उपाध्यक्ष शिरीष कटेकर याना उच्च रक्तदाबाचा त्रास, उपचारासाठी सोलापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल

  • 07 Feb 2021 11:07 AM (IST)

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज मुंबईत, पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसकडून निषेध

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज मुंबईत आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलेला आहे. दादर पूर्वेला योगी सभागृह येथे निर्मला सीतारमण त्यांचा कार्यक्रम असून त्याच्यापासून काही मीटर अंतरावर काँग्रेसचा निषेध मोर्चा आहे. मोर्चासाठी काँग्रेसने जय्यत तयारी केली असून शेकडोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते जमले आहेत.

  • 07 Feb 2021 10:44 AM (IST)

    मुंबईत काँग्रेस विरूद्ध भाजप आमने-सामने, काँग्रेसचं आंदोलन तर भाजपची स्वागतासाठी रॅली

    मुंबईत काँग्रेस विरूद्ध भाजपचा आमने सामने, काँग्रेसचं आंदोलन तर भाजपचं स्वागतासाठी रॅली, निर्मला सितारमण यांच्या स्वागतासाठी बाईक रॅली, भाजपच्या युवा मोर्चाची वतीनं रॅलीला सुरूवात, दादर परिसरात काँग्रेसचं आंदोलन, योगी सभागृहापर्यंत त्यांचं स्वागत केलं जाणार – भाजपा युवा मोर्चा

  • 07 Feb 2021 10:07 AM (IST)

    मोबाईलवर कळणार एसटी बसचे लोकेशन, सोलापूर विभागातील 736 गाड्यांना ट्रेकिंग सिस्टीम

    सोलापूर- मोबाईलवर कळणार एसटी बसचे लोकेशन

    – सोलापूर विभागातील 736 गाड्यांना ट्रेकिंग सिस्टीम

    – एसटी कुठे आहे ?किती वेळात येणार याची माहिती मोबाईल वर समजणार

    – लॉकडाऊन होण्यापूर्वी महामंडळाने व्हीटीएस सिस्टम प्रणाली विकसित केली होती

    – या सर्व मशीन सर्व गाड्यांना राज्यभरात एकाच वेळी बसवण्यात येणार होत्या

    – लॉकडाऊनमुळे हा उपक्रम पुढे ढकलला गेला होता

    – लवकरच या प्रणालीचे उद्घाटन होणार

  • 07 Feb 2021 09:50 AM (IST)

    सोलापूरमध्ये दहा महिन्यात पन्नास हजार ग्राहकांनी भरला नाही वीज बिलाचा एकही छदाम

    सोलापूरमध्ये दहा महिन्यात पन्नास हजार ग्राहकांनी भरला नाही वीज बिलाचा एकही छदाम, लॉकडाऊन काळात विज बिल वाटपात येणारी अडचण, वीज दरात झालेली वाढ, आणि मंत्र्यांनी विज माफीचे दिलेले आश्वासन ठरले कारणीभूत, ग्राहकांच्या डोक्यावर कोट्यावधी रुपयांची थकबाकी दिली साचत, एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान जिल्ह्यात 192 कोटी आठ लाखांची थकबाकी

  • 07 Feb 2021 09:27 AM (IST)

    जालन्यात आज मराठा समाजाचा एल्गार मेळावा, विनायक मेटेही राहणार उपस्थित

    जालन्यात आज मराठा समाजाचा एल्गार मेळावा, विनायक मेटे यांच्या उपस्थितीत होणार एल्गार मेळावा, राज्यभरातील समन्वयकांची राहणार उपस्थिती,आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी मेळाव्यात विचार मंथन, उद्यापासून सुरू होतंय मराठ्यांचं एल्गार आंदोलन

  • 07 Feb 2021 09:26 AM (IST)

    गृहमंत्री अमित शाहसाठी मेडीकल काॅलेजमध्ये बनवली स्पेशल लिफ्ट

    गृहमंत्री अमित शाहसाठी मेडीकल काॅलेजमध्ये बनवली स्पेशल लिफ्ट – नारायण राणे यांनी काही दिवसाॅपुर्वीच केली या लिफ्टची पाहणी… – आज सिंधुदुर्गात येणार अमित शाह, ज्या लिफ्टने जाणार त्याला बनवण्यासाठी १८ लाखांचा खर्च… – भाजपा खासदार नारायण राणे यांनी कोकणात खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल बांधलंय, या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी अमित शाह सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारेय.

  • 07 Feb 2021 08:38 AM (IST)

    अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या व्यवस्थापकासह 14 संचालकांचं सभासदत्व रद्द

    अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या व्यवस्थापका सह आजी-माजी 14 संचालकांच सभासदत्व रद्द, विजय पाटकर,मिलिंद अष्टेकर, अलका कुबल यांच्याही नावाचा समावेश, आर्थिक नुकसानीला जबाबदार धरत अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांची कारवाई, धर्मदाय आयुक्तांनी आधीच 14 संचालकांना 10 लाख 75 हजार रुपयाच्या आर्थिक घोटाळ्याला जबाबदार धरत पैसे भरण्याचे दिले होते आदेश, पंधरा दिवसात आदेशाची अंमलबजावणी न झाल्यान कारवाई केल्याचं अध्यक्ष राजे भोसले यांच स्पष्टीकरण

  • 07 Feb 2021 08:37 AM (IST)

    मृत्यूची झुंज अखेर संपली! गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात जखमी महिलेचा मृत्यू,

    महिनाभरापासून सुरू असलेली मृत्यूची झुंज अखेर संपली – नाशिकच्या खुटवडनगर परिसरात घरगुती गॅस गळतीमुळे झालेल्या भिषन स्फोटात जखमी झालेल्या पुष्पा पगार यांचा उपचारादरम्यान मृत्यू – नातवाला सकाळच्या सुमारास दूध गरम करून देत असताना घडला होता प्रकार – घरातील चार जण या स्फोटात झाले होते जखमी

  • 07 Feb 2021 08:27 AM (IST)

    वीज बिल वाढी विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी चंद्रशेखर बावनकुळेंसह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

    वीज बिल वाढी विरोधात कोराडी औष्णिक वीज केंद्रा समोर आंदोलन केल्या प्रकरणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे सह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, कोराडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल, मनाई आदेश असताना सुद्धा आंदोलन केल्यामुळे करण्यात आले गुन्हे दाखल

  • 07 Feb 2021 08:26 AM (IST)

    19 किलो गांजा राहत्या घरात साठवून ठेवणाऱ्या तरुणाला आळंदी पोलिसांकडून अटक

    -आर्थिक फायद्यासाठी एकोणीस किलो गांजा राहत्या घरात साठवून ठेवणाऱ्या तरुणाला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे.

    -तब्बल तीन लाख 08 हजार 640 रूपये किंमतीचा 19 किलो 290 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त

    -अक्षय शेळके असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

    -आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव तर्फे चाकण याठिकाणी हि कारवाई करण्यात आली.

  • 07 Feb 2021 08:25 AM (IST)

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील बोगस ‘एफडीआर’ प्रकरणी आणखी दोन गुन्हे दाखल, एकास अटक

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील बोगस ‘एफडीआर’ प्रकरणी आणखी दोन गुन्हे दाखल, एकास अटक

    -या आधी पाच ठेकेदार कंपनी वर केले आहेत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल,एकूण सात ठेकेदार कंपनी वर गुन्हे दाखल

    -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवेदांसाठी बनावट एफडीआर सादर केलेल्या आणखी काही ठेकेदारांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती

  • 07 Feb 2021 08:08 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यातील चार तालुक्यातील 174 गावाच्या सरपंच निवडी लांबणीवर

    जिल्ह्यातील चार तालुक्यातील 174 गावाच्या सरपंच निवडी लांबणीवर, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचा निर्णय, मंगळवारी होणार या गावांच्या आरक्षणावर सुनावणी, स्थगित झालेले गावांमध्ये पन्हाळा कर्मवीर शिरोळ आणि भुदरगड तालुक्यातील गावांचा समावेश, सरपंच आरक्षण रोटेशन नुसार नसल्याची काही गावातील लोकांनी केली होती तक्रार, उर्वरित आठ तालुक्यातील 251 ग्रामपंचायत सरपंच निवड मात्र ठरल्याप्रमाणे 9 फेब्रुवारीलाच होणार

  • 07 Feb 2021 08:07 AM (IST)

    बॅग लिफ्टिंगचा बनाव काही तासातच नाशिक पोलिसांकडून उघड

    बॅग लिफ्टिंगचा बनाव काही तासातच नाशिक पोलिसांकडून उघड – फिर्यादी मास्टर माईंडलाच ठोकल्या मुंबई नाका पोलिसांनी बेड्या – मुंबई नाका परिसरात उभ्या असलेल्या स्विफ्ट कारची काच फोडून 15 लाख रुपये असलेली बॅग चोरट्यानी गहाळ केल्याचा रचला होता बनाव – 15 लाख रुपयांची रक्कम रोलेट मधली असल्याचा संशय,मुंबई नाका पोलिसांचा अधिक तपास सुरू

  • 07 Feb 2021 08:07 AM (IST)

    भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील वाहतुक 10 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार

    भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील वाहतुक 10 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यत बंद राहणार, अतिवृष्टीमुळे पडलेल्या दरडी आणि संरक्षण भिंतींचे काम पूर्ण करण्यासाठी 10 सर्व वाहनांसाठी वाहतूक बंद, शासनाकडून घाटातील महाडच्या हद्दीतील रस्त्याचे आणि संरक्षण भिंतीचे काम करण्यासाठी ५ कोटी ४० लाख ५५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला, त्यामुळे 10 एप्रिलमंगळवारपासून येथील काम सुरू करण्यात येणार

  • 07 Feb 2021 08:06 AM (IST)

    पुणे पोलिसांची तत्परता, सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या हरवलेल्या कुत्र्याचा बारा तासात घेतला शोध

    पुणे पोलिसांची तत्परता सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या हरवलेल्या कुत्र्याचा घेतला बारा तासात शोध, सहायक पोलीस आयुक्त वियज चौधरी यांचे अमेरिकन जातीचे 60 हजार रुपये किमतीचा कुत्रा चाेरट्यांनी पळवला, लष्कर पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत चोरट्यांना पकडून कुत्रा त्यांच्या ताब्यात दिला, परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करून चोरट्यांचा काढला माग

  • 07 Feb 2021 07:56 AM (IST)

    नावापुरातील जवळपास 9 लाखाहून अधिक पक्षांचं क्लिनिंग ऑपरेशन सुरू

    – नवापूरात 15 वर्षानंतर पुन्हा बर्ड फ्ल्यू

    – नंदुरबार जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकरी डा राजेंद्र भारूड यांनी दिली. नंतर आजपासून सकाळी 9 वाजता क्लिनिंग ऑपरेशन सुरू होणार आहे – नावापुरातील जवळपास 9 लाखाहून अधिक पक्षांचं क्लिनिंग ऑपरेशन सुरू

    – चिकन व अंडीवर विक्री बंदी,नवापूर परिसर सील कलणार

    – पोल्ट्री व्यावसायिकांचे करोडो रुपयांचे नुकसान

    – जिल्हा प्रशासनाने नवापूर 26 पोल्ट्रीमध्ये ॲक्शन प्लॅन सुरू केला.

    – नवापूरात कोरोना संकटात बर्ड फ्ल्यू संकट आल्याने व्यावसायिक चिंतातूर…

  • 07 Feb 2021 07:55 AM (IST)

    नियमांचं उल्लंघन करणाऱ्या खाजगी बसेसला आरटीओचा दणका

    नियमांचं उल्लंघन करणाऱ्या खाजगी बसेसला आरटीओचा दणका – रात्रीच्या सुमारास अचानक तपासणी मोहीम राबवत 54 खाजगी बसेसवर केली कारवाई – खाजगी बस चालकांकडुन सर्रासपणे होतय नियमांचं उल्लंघन

  • 07 Feb 2021 07:55 AM (IST)

    रोलेट प्रकरणातील मुख्य संशयित कैलास शहा, रमेश चौरसिया विरोधात लुकाऊट नोटीस

    रोलेट प्रकरणातील मुख्य संशयित कैलास शहा रमेश चौरसिया या दोघांविरोधात लुकाऊट नोटीस बजावली – नाशिक पोलीस एक्शन मोडमध्ये – काही दिवसांपूर्वी नामदेव चव्हाण या तरुणांने रोलेट प्रकरनातून केली होती आत्महत्या – गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस आहेत मागावर

  • 07 Feb 2021 07:54 AM (IST)

    कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाइन होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा आता ‘ऑफलाइन’ होणार

    कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाइन होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा आता ‘ऑफलाइन’ होणार

    सभागृहात सदस्यांसह दोनशे जणांच्या उपस्थितीत सभा घेता येणार

    यासंदर्भातील आदेश येत्या सोमवारी (ता.९) निघण्याची शक्यता

  • 07 Feb 2021 07:54 AM (IST)

    कोरोनाबाधितांची संख्या पुणे शहरात दिवसेंदिवस कमी होत असल्याचे समाधानकारक चित्र

    कोरोनाबाधितांची संख्या पुणे शहरात दिवसेंदिवस कमी होत असल्याचे समाधानकारक चित्र

    ३० मार्च २०२० नंतर एप्रिलचा पहिला पंधरवडा वगळता शनिवारी प्रथमच पुणे शहरात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही

    कोरोना महामारीचा संसर्ग सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या टप्प्यात शहरात दररोज सरासरी ३० पेक्षा जास्त कोरोना बळी

    पुण्यात ८ मार्च, २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित आढळला

    त्यानंतर सातत्याने बाधितांची संख्या वाढत गेली आणि ३० मार्च २०२० रोजी कोरोनाबाधिताचा पहिला बळी पुण्यात गेला होता

  • 07 Feb 2021 07:31 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर

    – उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर

    – आज आणि उद्या नागपुरात घेणार पक्ष संगठनाचा आढावा , सोबतच उद्या डीपीडिसीची आढावा बैठक

    – नागपूरला जिल्हा विकास वाढीव निधी मिळणार का ? याकडे लागलं सर्वांचं लक्ष

    – भाजपच्या काळात 525 कोटी रुपयांवर पोहचलेला निधी महाविकास आघाडीने निम्मा केला होता

    – मात्र अर्थमंत्री उपराजधानीच्या शहराचा निधी वाढविणार का? याकडे सगळ्यांच लागलं लक्ष आहे

  • 07 Feb 2021 07:22 AM (IST)

    नागपुरात राष्ट्रवादी-काँग्रेसची ताकद वाढणार, आज अनेक कार्यकर्त्यांचा होणार पक्षप्रवेश

    – नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस ला बळ मिळण्याची शक्यता

    – राष्ट्रवादीमध्ये आज होणार आजी माजी नगर सेवकांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश

    – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश

    – प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी नागपूर दौरा केल्यानंतर हे राष्ट्रवादी साठीचांगलं यश

  • 07 Feb 2021 07:18 AM (IST)

    केंद्रीय गृमंत्री अमित शहा आज सिंधुदूर्गात

    – केंद्रीय गृमंत्री अमित शहा आज सिंधुदूर्गात – भाजप खासदार नारायण राणेंच्या एसएसपीएम मेडिकल काॅलेजचे करणार उद्धाटन – दुपारी दोन वाजता भाजपच्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयाकडून उदघाटनाला उपस्थित रहाणार असल्याचं केलं गेलं ट्टिवट – शेतकरी आंदोलनामुळे एक दिवस उदघाटनाचा कार्यक्रम केला होता पुढे – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फड़णवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नते प्रविण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटली यांची उपस्थिती – केद्रीय गृह मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पाश्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था

  • 07 Feb 2021 07:15 AM (IST)

    मुंबई एंटी नारकोटिक्स सेलमार्फ़त ड्रग्स प्रकरणात 2 आरोपीना अटक

    – मुंबई एंटी नारकोटिक्स सेलमार्फ़त ड्रग्स प्रकरणात 2 आरोपीना अटक

    – 30 वर्षीय महिला 24 किलो गांजासोबत अटक

    – तर एका दुसऱ्या केसमध्ये एका पुरूष आरोपिला 23 किलो  गांजासोबत केली गेली आहे अटक

    – दोन्ही आरोपींकडून ऐकूण 9 लाख 40 हजार रुपए किंमतीचा गांजा जप्त

    – महिला मालाड पश्चिमवरुन तर पुरुषः आरोपी नेशनल पार्क समोरुन बोरीवलीवरुन केला गेला अटक

    – कांदिवली एंटी नारकोटिक्स सेल मार्फत करण्यात आली आहे कार्रवाई , पुढील तपास मात्र शुरू

  • 07 Feb 2021 07:14 AM (IST)

    नांदेडमध्ये कचऱ्याची समस्या आणखी वाढली, पालिकेचं दुर्लक्ष

    नांदेडमध्ये कचऱ्याच्या समस्येत दिवसेंदिवस भरच पडत चाललीय. शहरातील बुधवारच्या आठवडी बाजाराच्या क्षेत्रात साफसफाईकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यातून दोन्ही तरोडा आणि वाडी गावाच्या हद्दीतील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. त्यासोबतच साथीचे आजार बळावण्याची भीती असल्याने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करतायत. मात्र , आठवडी बाजारातून टॅक्स वसूल करणाऱ्या मनपाला इथल्या साफसफाईचे काही देणंघेणं असल्याचे दिसत नाही.

  • 07 Feb 2021 06:48 AM (IST)

    टँकरने दुचाकीला धडक दिल्याने पित्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

    नांदेड : टँकरने दुचाकीला धडक दिल्याने पित्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी- गोरठा रस्त्यावर शनिवारी रात्री ही घटना घडलीय. या अपघातात 45 वर्षीय सुभाष भीमा नाईक यांचा मृत्यू झालाय तर त्यांचा मुलगा सुजित गंभीर जखमी असून त्याच्यावर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे उमरी तालुक्यातील दुर्गानगर गावावर शोककळा पसरली आहे.

  • 07 Feb 2021 06:39 AM (IST)

    अमरावतीमधील ती महिला आय.ए.एस झालीच नाही

    अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्याची  मुलगी आणि गवंडी काम करणाऱ्याची पत्नी माधुरी गजभिये ही महिला जिल्हाधिकारी झाली अशी पोस्ट दोन दिवसापासून सोशल मीडियावर चांगलीच व्हारल होत आहे. त्यातच अमरावती च्या पालकमंत्री राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील माधुरी गजभिय च्या  घरी जाऊन तिचा सत्कार केला. परंतु केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१९ च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत माधुरी गजभिये या महिलेच नावच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने एकच  खळबळ उडाली आहे.

  • 07 Feb 2021 06:37 AM (IST)

    भारतात लसीकरण मोहिमेचा वेग जगात सर्वाधिक

    भारतात लसीकरण मोहिमेचा वेग जगात सर्वाधिक असल्याची बातमी समोर आली आहे. 21 दिवसांमध्ये 50 लाखांहून अधिक जणांना भारतात लस देण्यात आली आहे. अशातच सातारा जिल्ह्यातील खटाव पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकांनी कोरोना लस घेतली.

Published On - Feb 07,2021 9:17 PM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.