Aurangabad: वाळूज परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, दोन घरे फोडली
वाळूज परिसरात दोन चोरीच्या घटना उघडकीस आल्या असून यापैकी एका घरी तर चोरट्यांनी भर दुपारी डल्ला मारला. रांजणगावात दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
औरंगाबादः वाळूज परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच असून येथे दोन ठिकाणी घरफोडी झाल्याचे उघडकीस आले आहे. यापैकी वडगाव कोल्हाटी येथील दोन शेजारी असलेली घरे फोडून चोरच्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या दोन्ही आतेभावांची घरे असल्याने एका नातेवाईकांचे निधन झाल्याने प्रकाश कचरू आव्हाड आणि त्यांचा आतेभाऊ कैलास घुगे हे घराला कुलूप लावून गावाकडे गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून 50 हजार रुपये रोख, सोन्याची पोत, कानातले असे दानिने लंपास केले. तर कैलास घुगे यांच्या घरातून एक एलईडी टीव्ही, सोन्याचे व चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा माल चोरीस नेला.
रांजणगावातही भर दिवसा घरावर डल्ला
अन्य एका चोरीच्या घटनेत रांजणगाव येथील शिक्षक नगरात चोरट्यांनी घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 35 हजारांचा ऐवज लांबवला आहे. संजय निवृत्ती डोईफोडे हे वाळूज येथील एका कंपनीत कामाला आहेत. 21 नोव्हेंबर रोजी ते सकाळी कंपनीत गेले होते. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शेजारील दुकानात साखर आणण्यासाठी गेल्या. काहीवेळ गप्पा मारल्यानंतर घरी परतल्यावर त्यांना कपाटातील वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या दिसल्या. या घरातून चोरट्यांनी 15 हजार रुपये, सोन्याची अंगठी व चैन असा ऐवज चोरल्याची माहिती त्यांनी दिली.
इतर बातम्या-