Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aligarh Murder Update: दोन कुटुंबांत मध्यस्थी करणे पडले महागात; अलिगढमध्ये व्यावसायिकाची राजरोसपणे हत्या

अलिगढच्या स्थानिक पोलिसांनी बुधवारी या धक्कादायक हत्याकांडाचा खुलासा केला आहे. व्यावसायिक संदीपची हत्या दुसऱ्या कोणी केली नसून संदीपच्याच मित्रांनीच घडवून आणली आहे. राजीव अग्रवाल आणि अंकुश अग्रवाल अशी त्यांची नावे आहेत.

Aligarh Murder Update: दोन कुटुंबांत मध्यस्थी करणे पडले महागात; अलिगढमध्ये व्यावसायिकाची राजरोसपणे हत्या
मिठाईच्या दुकानातील उकळत्या पाण्यात पडली चिमुकली
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 10:53 PM

अलिगढ : दोन कुटुंबांमध्ये सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करणे अलिगढच्या एका सिमेंट व्यावसायिकाला महागात पडले आहे. दोन कुटुंबांत तोडगा काढल्यानंतर संतप्त झालेल्या एका कुटुंबाने गुंडांना सुपारी दिली आणि त्या शुटर्सना अलिगढमध्ये बोलावून व्यावसायिकाची राजरोसपणे हत्या करण्यात आली. दोन दिवसांनंतर अलिगढ पोलिसांनी या खळबळजनक हत्याकांडाचा खुलासा केला आहे. भांडण दोन गटांत आणि बळी तिसराच ठरल्याने या हत्याकांडाची परिसरात सर्वत्रच चर्चा सुरु झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 27 डिसेंबरच्या संध्याकाळी अलीगंज, एटा येथील रहिवासी असलेले सिमेंट व्यावसायिक संदीप गुप्ता आपल्या कामावरून अलीगढला आले होते. यादरम्यान अलिगढ रेंजचे डीआयजी दीपक कुमार यांची भेट घेऊन ते परत एटाला जात होते. याच दरम्यान अलीगढ शहरातील वर्दळीच्या सेंटर पॉइंट परिसरात त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राजरोसपणे करण्यात आलेल्या या हत्येच्या घटनेने संपूर्ण शहरात प्रचंड घबराट पसरली आहे.

मित्रांनीच घडवून आणले हत्याकांड

अलिगढच्या स्थानिक पोलिसांनी बुधवारी या धक्कादायक हत्याकांडाचा खुलासा केला आहे. व्यावसायिक संदीपची हत्या दुसऱ्या कोणी केली नसून संदीपच्याच मित्रांनीच घडवून आणली आहे. राजीव अग्रवाल आणि अंकुश अग्रवाल अशी त्यांची नावे आहेत. अंकुशचा पत्नी आणि सासरच्यांसोबत वाद सुरू होता. वास्तविक 4 वर्षांपूर्वी राजीव अग्रवालने त्याचा मुलगा अंकुश अग्रवालचा विवाह एटा जिल्ह्यातील अलीगंज येथे केला होता. अंकुश ज्या कुटुंबाशी संबंधित होता, ते कुटुंब सिमेंट व्यावसायिक संदीप गुप्ता यांच्या परिचयाचे होते.

या कारणांवरुन घडले हत्याकांड

काही दिवसांपूर्वी अंकुशच्या पत्नीने तिचा पती अंकुश अग्रवाल आपल्याला मारहाण करत असल्याची तक्रार केली होती. अंकुश हा पत्नीला निष्कारण त्रास देत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर संदीप गुप्ता यांनी अंकुश अग्रवाल आणि त्याचे वडील राजीव अग्रवाल यांना समजावून सांगितले. पण त्या दोघांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यानंतर अंकुश अग्रवालच्या पत्नीने अलीगंज पोलिस ठाण्यात पती आणि सासरच्यांविरुद्ध 376, 498 अ आणि हुंडा कायद्यासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात संदीप गुप्ता यांनी मध्यस्थी केली आणि प्रकरण मिटले. त्याअंतर्गत तक्रारदार महिलेला तडजोड म्हणून 45 लाख रुपये देण्यात आले.

मात्र या प्रकरणावरून आरोपी अंकुश आणि त्याचे वडील राजीव अग्रवाल यांनी सिमेंट व्यावसायिक संदीप गुप्ता यांच्याशी शत्रुत्व पत्करले होते. यादरम्यान त्यांनी संदीपचा बदला घेण्याचे ठरवले. आणि 27 डिसेंबरच्या संध्याकाळी भाड्याने आणलेल्या शूटरला घेऊन राजरोसपणे संदीप गुप्ताची अलिगढमध्येच हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपीच्या क्रेटा कारसह हत्येत वापरलेली कारही जप्त केली आहे. आरोपी अंकुश अग्रवालचे वडील राजीव अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र अंकुश, त्याचा मित्र दुष्यंत आणि हत्येमध्ये सहभागी झालेले दोन शूटर्स अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या हत्याकांडाचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी 5 पथके स्थापन केली होती. (Businessman murdered in Aligarh for mediating between two families)

इतर बातम्या

Delhi Crime: दिल्लीत आणखी एका महिलेवर गँगरेप; दोघा नराधमांना अटक

Accident | कंटेनर आणि ट्रॅव्हल्सची जोरदार धडक, 4 मृतांपैकी तिघांवर जागीच काळाचा घाला

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.