ऑटिझमग्रस्त मुलासाठी सांडणीच्या दुधाची गरज, मातेची मोदींना हाक, राजस्थानवरुन मुंबईत दूध दाखल
रेणु कुमारी यांच्या साडेतीन वर्षाच्या मुलाला ऑटिझम या दुर्धर आजाराने ग्रासलं आहे. या मुलाला गाय, म्हैस, शेळीच्या दुधाची अॅलर्जी आहे (Autistic child mother request PM Modi).
मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे (Autistic child mother request PM Modi). मात्र, लॉकडाऊनमुळे अनेकांची गैरसोय होत आहे. मुंबईत वास्तव्यास असलेल्या रेणू कुमारी यांच्या साडेतीन वर्षांच्या मुलाला ऑटिझम या दुर्धर आजाराने ग्रासलं आहे. तो सांडणीचंच दूध पितो. लॉकडाऊनदरम्यान या मुलाला सांडणीचं दूध मिळावं यासाठी मुलाच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरुन साद घातली. प्रशासनाने या महिलेच्या ट्विटची दखल घेत चक्क राजस्थानवरुन थेट मुंबईत सांडणीचं दूध दाखल केलं (Autistic child mother request PM Modi).
मुंबईत राहणाऱ्या रेणु कुमारी यांच्या साडेतीन वर्षाच्या मुलाला ऑटिझम या दुर्धर आजाराने ग्रासलं आहे. या मुलाला गाय, म्हैस, शेळीच्या दुधाची अॅलर्जी आहे. तो फक्त सांडणीचं दूध पितो. राजस्थानच्या साद्री येथून ही महिला सांडणीचं दूध मागवत असे. मात्र, लॉकडाऊनमुळे सांडणीचं दूध मिळवणं अशक्य झालं. त्यामुळे तिने ट्विट करत आपली समस्या सांगितली. या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान मोदींनादेखील टॅग केलं होतं.
@narendramodi Sir I have a 3.5 yrs old child suffering from autism and severe food allergies . He survives on Camel Milk and limited qty of pulses. When lockdown started I didn’t have enough camel milk to last this long. Help me get Camel Milk or its powder from Sadri(Rajasthan).
— neha kumari (@nehakum79798495) April 4, 2020
नेहा कुमारींचं ट्विट बघितल्यानंतर आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. बोथरा यांनी अॅडव्हिक फूड्स या कंपनीशीदेखील संपर्क साधला. ही कंपनी सांडणीच्या दूधाचं पावडर बनवते. या कंपनीने दूध देण्यास होकार दिला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाची मदत घेऊन दूध मुंबईच्या नेहा कुमारींच्या घरी पोहोचवण्यात आलं.
नेहा कुमारींच्या घरी 20 लिटर दूध पोहोचल्यानंतर अरुण बोथरा यांनी काल (12 एप्रिल) ट्विटरवर याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी उत्तर-पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक तरुण जैन यांचे आभार मानले. कारण त्यांच्या मदतीने नियोजित नसणाऱ्या स्थानकावर रेल्वे थांबवण्यात आली आणि मुंबईत दूध पोहोचवण्यात आलं.
Final update
20 lts. camel milk reached Mumbai by train last night. The family has kindly shared part of it with another needy person in the city.
Thanking Sh.Tarun Jain, CPTM, North-West Railways who ensured an unscheduled halt to pick the container.@RailwaySeva@RailMinIndia https://t.co/fCxI6EJTrX
— Arun Bothra (@arunbothra) April 11, 2020