48 तासांत बिबट्याला पकडा, अन्यधा गोळ्या घालण्याचे आदेश देऊ; वडेट्टीवारांचे वनविभागाला निर्देश

येत्या 48 तासांच्या आत बिबट्याला पकडा नाहीतर बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश सरकारकडून दिले जातील, असे निर्देश चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

48 तासांत बिबट्याला पकडा, अन्यधा गोळ्या घालण्याचे आदेश देऊ; वडेट्टीवारांचे वनविभागाला निर्देश
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 7:19 PM

चंद्रपूर : येत्या 48 तासांच्या आत बिबट्याला पकडा नाहीतर बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश सरकारकडून दिले जातील, असे निर्देश चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. (Catch the leopard in 48 hours or else we’ll order to shoot; Instructions to Forest Department from Vijay Vadettiwar)

ब्रम्हपुरी तालुक्यातील चिचगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या परिवारांची पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी भेट घेतली. तसेच पीडित कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले. चिचगाव येथे एका आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात 2 महिलांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही मृत महिलांच्या कुटुबियांची आज पालकमंत्र्यांनी भेट घेतली.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज चिचगाव येथे जाऊन मृतकांच्या कुटुंबियांची भेट घेतली, आणि त्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीचे धनादेश दिले. चिचगाव येथे गेल्या एका आठवड्यात 2 महिलांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यापैकी पहिली घटना 3 डिसेंबर रोजी घडली. या घटनेत ताराबाई ठाकरे (55) या महिलेचा मृत्यू झाला.

बिबट्याच्या हल्ल्याची दुसरी घटना 7 डिसेंबर (सोमवारी) रोजी घडली. या घटनेत सायत्रा ठेंगरी (60) या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आज चिचगाव येथे जाऊन ठाकरे आणि ठेंगरी या दोन्ही मृत महिल्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. दरम्यान वडेट्टीवार यांनी गावकरी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, तसेच गावकऱ्यांना आश्वस्त केले.

ब्रम्हपुरी तालुक्यातील चिचगाव (डोर्ली) येथे बिबट्याच्या हल्ल्यात सायत्रा ठेंगरी (60) या महिलेचा सोमवारी मृत्यू झाला. ही महिला सरपण गोळा करायला संध्याकाळी घरामागे गेली होती. त्यावेळी बिबट्याने या महिलेवर हल्ला केला, त्यात महिलेला प्राण गमवावे लागले. तसेच गेल्या आठवड्यात गुरुवारी म्हणजेच 3 डिसेंबर रोजी याच गावातील ताराबाई ठाकरे या 55 वर्षीय महिलेचा बिबट्याचा हल्ल्यात मुत्यू झाला होता, सकाळी गावाबाहेर शेण टाकायला गेलेल्या ताराबाईंवर बिबट्याने केला होता.

बिबट्याच्या हल्ल्यांमुळे गावकरी चिंतेत आहेत. घराबाहेर पडावे की पडून नये, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. परंतु शेतीच्या कामांसाठी, उदरनिर्वाहासाठी घराबाहेर पडणे गरजेचे आहे. अशात जीव मुठीत धरुन गावकरी घराबाहेर पडत आहेत.

इतर बातम्या

आईसोबत फिरायला गेलेल्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला, CISF जवानाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

PHOTO : वन्यजीव प्रेमींसाठी आनंदाची बातमी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बिबट्याच्या जोडीचं दर्शन

(Catch the leopard in 48 hours or else we’ll order to shoot; Instructions to Forest Department from Vijay Vadettiwar)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.