स्वदेशी शस्त्रांच्या बळावर युद्ध जिंकलं तर त्यापेक्षा मोठं सुख नाही : CDS बिपीन रावत
"भारतात तयार झालेल्या स्वदेशी शस्त्रांच्या बळावर युद्ध जिंकलं तर त्यापेक्षा मोठं सुख नाही", अशी भावना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त केली आहे (CDS Bipin Rawat said no greater satisffaction than winning war With Made In India Weapons)
नवी दिल्ली : “भारतात तयार झालेल्या स्वदेशी शस्त्रांच्या बळावर युद्ध जिंकलं तर त्यापेक्षा मोठं सुख नाही”, अशी भावना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त केली आहे. ते एका वेबिनारमध्ये बोलत होते (CDS Bipin Rawat said no greater satisffaction than winning war With Made In India Weapons).
“आमच्याजवळ चांगल्या गुणवत्तेचे स्वदेशी शस्त्रांचं उत्पादन करण्याची क्षमता आणि सामर्थ्यदेखील आहे. केंद्र सरकारने दाखवलेल्या आत्मनिर्भर भारतच्या मार्गाने पुढे जाण्याची वेळ आता आली आहे. आपल्याला आता स्वावलंबी बनून संरक्षण उपकरणांचा निर्यातदार बनण्याची वेळ आली आहे”, असं बिपिन रावत म्हणाले.
“भारताने ज्याप्रकारे कोरोनाविरोधात लढा दिला, ते पाहिल्यावर भारताकडे कोणत्याही संकटाचा सामना करण्याचा आणि ते संकट दूर सारण्याची क्षमता आहे, हे स्पष्ट होतं. भारत सध्या अनेक आव्हानं आणि संकटांना तोंड देत आहे”, असंदेखील बिपिन रावत म्हणाले (CDS Bipin Rawat said no greater satisffaction than winning war With Made In India Weapons).
संरक्षणमंत्र्यांचा ‘मेक फॉर वर्ल्ड’चा नारा
दरम्यान, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘मेक इन इंडिया’सह आता ‘मेक इन वर्ल्ड’चा नारा दिला आहे. देशासह आता जगासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.
“आपल्या आता स्वावलंबी बनून जगासाठी महत्त्वपूर्ण योगदान द्यायचं आहे. स्वालंबी व्हायचं याच विचारातून देशात आयात केले जाणारे 101 संरक्षण उपकरणांवर बंधी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. मला विश्वास आहे, आपण फक्त ‘मेक इन इंडिया’ नाही तर ‘मेक फॉर वर्ल्ड’ हे धोरण साध्य करु”, असं राजनाथ सिंह म्हणाले.
We want to become self-reliant to contribute to the world in a better way. In this direction, some bold policy reforms have been taken like the ban on import of 101 defence items: Defence Minister Rajnath Singh at a defence industry outreach webinar pic.twitter.com/fPU3aRvRQb
— ANI (@ANI) August 27, 2020
हेही वाचा : Facebook ला जाहिरात देण्यात भाजप सर्वात पुढे, टॉप 10 मध्ये काँग्रेस-AAP चाही समावेश