मुंबई – अदानी ग्रुप (Adani Group)आता सिमेंटच्या क्षेत्रातही उतरली आहे. अंबुजा आणि एसीसी (Ambuja and ACC cement)या सिमेंट क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्या अदानी टेकओव्हर करत आहेत. हा व्यवहार १०.५ अब्ज डॉलर्सचा आहे. अदानी ग्रुपचे चेयरमन गौतम अदानी (Gautam Adani)हा व्यवहार करण्यासाठी गेल्या आठवड्यात अबुधाबी आणि लंडनला गेले होते. आता ते भारतात परतले आहेत. एसीसी म्हणजे एसोसिएटेड सिमेंट कंपनीवर मालकी हक्क हा होलसीम कंपनीचा आहे, ही स्वित्झर्लंडची बिल्डिंग मटेरियलची कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात १ ऑगस्ट १९३६ साली मुंबईत झाली होती. काही ग्रुप्सने एकत्र येऊन या कंपनीची सुरुवात केली होती. या कंपनीचे टेकओव्हर केल्याचे गौतम अदानी यांनी ट्विटवरुन जाहीर केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, भारताच्या कहाणीवर आमचा ठाम विश्वास आहे. होलसीमच्या सिमेंट मालमत्तेला आमच्या ग्रीन एनर्जी आणि लॉजिस्टिकशी जोडल्याने आम्ही भारतातील सिमेंटच्या जगातील सर्वात ग्रीनेस्ट सिमेंट कंपनी झालो आहोत.
Our belief in the India story is unshakeable. Combining @Holcim‘s cement assets in India with our green energy and logistics will make us the world’s greenest cement company. Jan Jenisch has been terrific to work with. We welcome the @AmbujaCementACL & @ACCLimited teams. pic.twitter.com/iThyLp92iV
हे सुद्धा वाचा— Gautam Adani (@gautam_adani) May 15, 2022
होलसीम कंपनीने भारतात १७ वर्षांपूर्वी व्यवसाय सुरु केला होता. ती जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी मानली जाते. या करारानंतर आता कंपनी भारतातील त्यांचा व्यवसाय बंद करणार आहे. होलसीम कंपनीच्या देशआतील दोन कंपन्यांची अंबुजा आणि एसीसी कंपन्यांत भागिदारी आहे. ७३,१२८ कोटींच्या अंबुजा कंपनीत होलसिमची ६३.१ टक्के भागिदारी आहे.
एसीसी कंपनीत अंबुजाचा ५० टक्क्यांचा वाटा आहे. तर होलसीमचा ४.४८ टक्के वाटा आहे. होलसीमचा भारतातील व्यवसाय खरेदी करणाऱ्याला एसीसीच्या २६ टक्क्यांसाठी ओपन ऑफऱ आणायची होती. ही ऑफऱ १०,८०० कोटी म्हणजेच १.४२ अब्ज डॉलर्सची होती. अंबुजा सिमेंटची क्षमता ३.१ कोटी मीट्रिक टन इतकी आहे. तर अंबुजा आणि एसीसी मिळून त्यांची क्षमता ६.४ कोटी मीट्रिक टन इतकी आहे.
१९८८ साली कमोडिटी ट्रेडिंग फर्मच्या माध्यमातून सुरु झालेल्या अदानी समुहाचा विस्तार चकित करणारा आहे. बंदरांच्या व्यवसायात उतरल्यानंतर ते राष्ट्रीय पातळीवर आले आहेत. गेल्या काही वर्षांत या समुहाने ग्रीन एनर्जी, मीडिया, ऑईड अँड गॅस, मायनिंग, एयरपोर्ट ऑपरेशन्स, कंन्स्ट्रक्शन, फूड प्रोसेसिंगमध्ये आपला ठसा उमटवला आहे. अदानी गेल्या वर्षी अदानी सिमेंटच्या नावाने सिमेंट क्षेत्रात आले होते. एसीसीच्या टेक ओव्हरमुळे ते या क्षेत्रातील मोठे प्लेयर झाले आहेत.
अंबुजा सिमेंटची स्थापना १९८३ साली झाली होती. अंबुजा सिमेंटचा दर्जा हा चांगला मानण्यात येतो.