Fact Check : केंद्र सरकार प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार 90 हजार रुपये?, वाचा काय आहे सत्य

व्हायरल पोस्टमध्ये आणि व्हीडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकार सगळ्यांच्या खात्यामध्ये 'प्रधानमंत्री जन सम्मान योजना' अंतर्गत 90,000 रुपये जमा करणार आहे.

Fact Check : केंद्र सरकार प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार 90 हजार रुपये?, वाचा काय आहे सत्य
या व्यतिरिक्त, पात्र सदस्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यांना कौटुंबिक पेन्शन मिळविण्यासाठीही योजनेचे प्रमाणपत्र उपयुक्त ठरते. उमंग अॅपद्वारे योजनेच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचा फायदा म्हणजे आता लोकांना शारीरिकरित्या अर्ज करण्याच्या अडचणींपासून मुक्तता मिळेल.
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 10:43 AM

नवी दिल्ली : सरकार प्रत्येकाच्या खात्यामध्ये ‘प्रधानमंत्री जन सम्मान योजना’ (Pradhan Mantri Jan Samman Yojana 2020) अंतर्गत 90,000 हजार जमा करणार असल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. याचा एक व्हीडिओदेखील तुफान व्हायरल झाला आहे. पण हे खरं आहे की खोटं असाही प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. व्हायरल पोस्टमध्ये आणि व्हीडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकार सगळ्यांच्या खात्यामध्ये ‘प्रधानमंत्री जन सम्मान योजना’ अंतर्गत 90,000 रुपये जमा करणार आहे. (central government will deposit Rs 90000 in everyones account know the fact check)

तुमच्याकडेही जर असा मेसेज आला असेल तर सावधान. कारण ही बातमी खोटी आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवण्यासाठी अशी पोस्ट शेअर करण्यात आली आहे. सरकारची अशी कोणतीही योजना खात्यात पैसे जमा करणार नाही. त्यामुळे अशा अफवांना बळी पडू नका, अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे प्रधानमंत्री जन सम्मान योजना ही केंद्र सरकारची योजना नाही. पीआयबी फॅक्ट चेकमध्ये ही बातमी खोटी असल्याचं सांगण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबवली जात नाही. पीआयबी वेळो-वेळी लोकांना सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवांबद्दल जागरूक करत असते.

या योजनेत कोणीही आपली खासगी माहिती शेअर करू नका. अन्यथा तुमचं बँक अकाऊंट कधीही खाली होऊ शकतं. सोशल मीडियावर येणाऱ्या अशा कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवू नका. याने तुमचा डेटा आणि बँकेसंबंधी माहिती लिक होण्याची शक्यता आहे. (central government will deposit Rs 90000 in everyones account know the fact check)

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हीडिओनंतर अनेक लोकांनी या योजनेत आपलं नाव नोंदवलं आहे. पण त्यांनी तात्काळ आपली माहिती काढून टाकावी. कारण, ही योजना खोटी आहे. पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) ट्वीट करून यासंबंधी माहिती दिली आहे. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्यााधी त्याची विश्वासहर्ता नक्की तपासा.

पीआयबी फॅक्ट चेक केंद्र सरकारची पॉलिसी, योजना, विभाग आणि मंत्रालयासंबंधी होणाऱ्या अफवा थांबवण्याचं काम करते. यातून कोणताही गुन्हा होण्यापासून रोखला जाऊ शकतो. तुम्हालाही जर एखाद्या माहितीविषयी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्ही 918799711259 नंबरवर मदत मागू शकता किंवा pibfactcheck@gmail.com या मेलवर त्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता.

इतर बातम्या – 

‘CM उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ समजावून सांगणाऱ्यास आम्ही 1001 रुपयाचं बक्षिस देऊ’
डिस्काऊंटसोबत खरेदी करा स्वस्त सोनं, आजपासून सुरू होतेय सरकारी योजना

(central government will deposit Rs 90000 in everyones account know the fact check)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.