सुशांतने आत्महत्या केल्याचं मुंबई पोलिसांचा दोन दिवसांत निष्कर्ष, तर सीबीआयला दोन महिने लागले: भुजबळ

काही लोकांना सुशांत गेल्याचं दु:ख नव्हतंच. त्यांना केवळ राजकारण करायचं होतं. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला बदनाम करणं हा त्यामागचा एकमेव हेतू होता, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपचं नाव न घेता केली.

सुशांतने आत्महत्या केल्याचं मुंबई पोलिसांचा दोन दिवसांत निष्कर्ष, तर सीबीआयला दोन महिने लागले: भुजबळ
सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे सुशांतच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काही घोळ झाला का? असा आरोप होत होता. पण यानंतर शवविच्छेदन आणि फॉरेंसिक रिपोर्ट हा सुप्रीम कोर्टाकडे पाठवण्यात आला. आता हा सीबीआयकडे पाठवण्यात आला आहे.
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 4:29 PM

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली हे मुंबई पोलिसांनी दोन दिवसात सांगितले. तेच सांगायला सीबीआयने दोन महिने घेतले, अशी खोचक टीका राज्याचे अन्न व नागरी पूरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. (chhagan bhujbal on sushant singh rajput case)

प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी सुशांतप्रकरणावरून भाजपला धारेवर धरले. मुंबई पोलिसांनी दहशतवाद्यांच्या गोळ्या छातीवर झेलल्या. त्याच पोलिसांवर काही लोकांनी अविश्वास दाखवला. सुशांतप्रकरणात मुंबई पोलिसांना बदनाम करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनाही बदनाम केलं गेलं. एवढंच नव्हे तर मुंबईची तुलना पाकिस्तानशीही करण्यात आली. पण मुंबई पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करत सुशांतने आत्महत्याच केल्याचं दोन दिवसांतच सांगितलं होतं. सीबीआयला मात्र त्यासाठी दोन महिने घ्यावे लागले, असा टोला भुजबळ यांनी त्यांच्या खास शैलीत लगावला.

काही लोकांना सुशांत गेल्याचं दु:ख नव्हतंच. त्यांना केवळ राजकारण करायचं होतं. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला बदनाम करणं हा त्यामागचा एकमेव हेतू होता, अशी टीकाही त्यांनी भाजपचं नाव न घेता केली.

सोलापूर येथील शिवसेना नेते महेश कोठे हे त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यावरही भुजबळांनी भाष्य केलं. लोकल स्तरावरचं राजकारण वेगळं असतं. पण स्थानिक पातळीवर अटीतटीचं राजाकरण होऊ नये यासाठी प्रयत्न असावेत. अशा घटनांमुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. (chhagan bhujbal on sushant singh rajput case)

संबंधित बातम्या:

सुशांतची पवना, मुंबईतील प्रॉपर्टी हडपण्याचा कुटुंबाचा डाव होता का?; शिवसेनेकडून चौकशीची मागणी

आता सुशांतप्रकरणाचा अहवाल अंध भक्त नाकारणार काय?, शिवसेनेचा सवाल

सुशांतप्रकरणी शिवसेना नेत्यांना आत्मसाक्षात्कार झालाय का?: भाजपचा खोचक सवाल

(chhagan bhujbal on sushant singh rajput case)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.