जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, हिजबुल मुजाहिद्दीनचा मुख्य कमांडर सैफुल्लाहचा खात्मा
काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. यासोबतच एका संशयितालाही अटक करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. रविवारी रंगरेथ इथं झालेल्या चकमकीदरम्यान हिजबुल मुजाहिद्दीनचा मुख्य कमांडर डॉ सैफुल्लाह याला गोळ्या घालून ठार करण्यात आलं आहे. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. यासोबतच एका संशयितालाही अटक करण्यात आली आहे. (chief operating commander saifullah of hizbul killed in encounter jammu and kashmir )
पोलीस महानिरीक्षक काश्मीर रेंज विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या सीमेवर रंगरेथ भागात झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा मुख्य ऑपरेशन कमांडर डॉ. सैफुल्लाह याला ठार करण्यात आलं आहे. यावेळी एका संशयितालाही अटक करण्यात आली असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. मई रियाज नायकूची हत्येनंतर यंदा सुरक्षा दलाला आलेलं हे दुसरं मोठं यश आहे.
काश्मीर पोलीस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विशेष लीडच्या आधारी पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त संघाने रंगरेथ क्षेत्रामध्ये घेराव घातला आणि सैफुल्लाह याला ठार करण्यात आलं. आयपीजी यांनी सांगितलं की, ‘ठार झालेला दहशतवादी हा हिजबुल मुजाहिद्दीनचा मुख्य ऑपरेशन कमांडर डॉ. सैफुल्लाह असल्याची मला 95 टक्के खात्री आहे.’
इतर बातम्या –
विधान परिषदेसाठी 12 जण ठरले, पवार-ठाकरेंकडे नावं गुप्त : अनिल देशमुख
विवाहित प्रियकराकडून प्रेयसीचा खून, हत्येच्या थरारानं चंद्रपूरमध्ये खळबळ
VIDEO | 50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज |1 November 2020https://t.co/955NGtIXF8#NEWS #NewsUpdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 1, 2020
(chief operating commander saifullah of hizbul killed in encounter jammu and kashmir )